एकातून दुसरी गोष्ट मिळत जाते. विरोध न करता वाहता आले पाहिजे. संजीवनी खेर ह्यांचे "नोबेल साहित्यिक" हे पुस्तक वाचताना पहिलेच प्रकरण बाॅब डिलन वर आहे. कुतुहल वाटले म्हणून यूट्यूबवर जाऊन बाॅबला ऐकले. त्याची ब्लोइंग इन द विंड, टँबोरिन मॅन वगैरे गाणी व लिरिक्स खूप आवडली. ऐकता ऐकता जोआन बेझचे नाव सारखे येऊ लागले. म्हणून तिचे हंड्रेड माइल्स हे साँग ऐकले व तिच्या आवाजाची ताकद, रेंज व मेलडी ह्यानी अक्षरश: वेड लावले. ह्या आठवड्यात तिची खूप साँग्ज ऐकली. डायमंड अँड रस्ट, बांगलादेश, सॅटिसफाइड माइंड, लिली ऑफ द वेस्ट अशी कितीतरी. संजीवनी खेरांच्या पुस्तकातून इतर नामवंत नोबेल विजेत्या साहित्यिकांचा व त्यांच्या साहित्याचा अल्प परिचय झाला. त्यातले नायपाॅल व पामुक मी वाचले आहेत. एल्फ्रीड येलिनेक यांचे पियानो टीचर अॅमेझाॅन वरून मागवले. पुढची यादी करून ठेवली आहे. जगभरातील उत्कृष्ट साहित्यात हाताळलेले विविध विषय, अन्यायाला, दु:खाला वाचा फोडणारे बहूआयामी लेखन ह्या सर्वांवर पुस्तकात चांगला प्रकाश पाडला आहे. पुस्तक वाचून नोबेल साहित्यिकांचे थोडे तरी साहित्य वाचण्याची प्रेरणा वाचकांस मिळण्यासारखी ...