Posts

Showing posts from August, 2022

पर्यटनाविषयी काही

एखाद्या ऐतिहासिक स्थळाला, वास्तूला, मंदीराला किंवा राजवाड्याला भेट देण्यापूर्वी त्याबद्दलची माहिती वाचून ठेवावी. सध्या गूगलवर हे सहज शक्य आहे. तिथला इतिहास, स्थापत्यकला, शिल्पकला ई. गोष्टींचा रसास्वाद घेण्यासाठी थोडी माहिती असणे जरूरी आहे. तरच ज्या काळात ती वास्तू बांधली गेली त्यावेळची स्पंदने जाणवतील, भिंती बोलू लागतील, चित्रं सजीव होऊन कथा सांगतील. बरेचदा आपला टूर प्रोग्रॅम आधीच ठरलेला असतो. जास्तीत जास्त ठिकाणे बघायची असतात. आपण भराभरा त्या वास्तूच्या दालनांतून फिरतो, फोटो काढतो, सेल्फी काढतो. पण त्या स्थळाचे, वास्तूचे सौंदर्य समजून घ्यायचा प्रयत्न करत नाही. इतिहासात डोकावत नाही. एखाद्या टूरच्या बरोबर गेलो असल्यास तर घाईच असते. टूरचा व्यवस्थापक जरासुद्धा मोकळेपणा देत नाही. म्हणून शक्यतो आपले आपणच टूरला जावे. कुठलेही ठिकाण वा स्थळ आपले ऐतिहासिक वैशिष्ट्य घेऊन उभे असते. ते त्या वैशिष्ट्यांसह अनुभवणे महत्वाचे आहे. रवींद्र शेणोलीकर