ज्योत
ज्योत कधी माझ्या काळजात मिणमिणते एक ज्योत कुट्ट काळ्या अंधारावर सहजपणे करते मात खोपटात कुठे गावी मिणमिणते एक ज्योत होतकरू कुणी विद्यार्थी प्रकाशतो अभ्यासात पडक्याशा देवळात मिणमिणते एक ज्योत सात्विकतेची उब पसरते गाभार्यात अगम्य ह्या विश्वात मिणमिणते ज्ञानज्योत कुतुहलाच्या तेलाने पेटते बुद्धीची वात रवींद्र शेणोलीकर