मीपण


माझे वेडेपण
माझे वेगळेपण
माझे नखरे
माझे मीपण

बेधुंद मी
बेभान मी
अचाट मी
अफाट मी

स्वतंत्र मी
अनिर्बंध मी
अशक्य मी
अतर्क्य मी

मीपणाचे
गीत माझे
माझ्यामधेच
रममाण मी

रविंद्र शेणोलीकर



Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

फक्त चोवीस तास

Windies vs Pak 1st Test