किनारा
किनारा मला बांधून ठेवणार्या किनार्या तुझे संरक्षण मला नकोय मला झोकून द्यायचे आहे उचंबळणार्या लाटांवर खवळलेल्या सागरात मला पाहायची आहेत नवी बेटं, नवे देश भिन्न माणसं, भिन्न संस्कृती नवे आकाश, नवे क्षितीज नवी स्वप्ने, नवी आव्हाने मला ओढत राहणार्या किनार्या तुझा गुलाम होणे मला मंजूर नाही तुझ्यातून मुक्त होऊन मला भरारी घेऊ दे रवींद्र शेणोलीकर