दारावरची बेल
दारावरची बेल आजही वाजते
पेपरवाला असतो किंवा दूधवाला
किंवा सोसायटीचा वाॅचमन
काही सूचना देण्यासाठी
येत नाहीत ते नातलग, मित्र
सहज, न सांगता, कळवता
फोनही खणखणत नाही पहिल्यासारखा
कधीतरी वाजतो....बिल भरा सांगायला
मोबाइल वरही फोन येतात
विमा व इस्टेट एजन्टचे
क्रेडिट कार्ड विक्रेत्यांचे
बक्षिसाचे आमिष दाखवणार्यांचे
क्वचित फोन येतो
मित्राचा वा नातलगाचा
विचारपूस, गप्पा
चालतात बराच वेळ
तेव्हा मात्र वाटते....
अजून आशा आहे
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment