अंधाधुन
'अंधाधुन' ची तिकिटे काढून चित्रपट बघायला गेलो. पोहोचायला उशीर झाला. शीर्षके दाखवत होते. आमच्या सीटवर कोणी दुसरेच बसले होते. कोणीही अटेन्डन्ट हजर नव्हता. खायचे पदार्थ घेऊन येणार्या एका माणसाला पकडले. त्याने काय चेक केले त्यालाच माहित पण आम्हाला सांगितले की त्या लोकांचे सेम सीट नंबर्स आहेत. जरा आवाज चढवल्यावर मॅनेजरकडे घेऊन गेला. मॅनेजर तत्परतेने आमच्या बरोबर सिनेमागृहात आला. आमची तिकिटे त्याने चेक केली होती. आमच्या सीटवर बसलेल्यांची तिकिटे पाहिली तर ती पुढच्या दिवशीची होती. ते लोक उठून हसतहसत निघून गेले. साॅरी वगैरे बोलण्याची तसदी त्यांनी घेतली नाही आमची दहा पंधरा मिनिटे वाया गेली.
पण चित्रपटाने सुरूवातीपासूनच इतकी छान पकड घेतली की आम्ही झाला प्रकार विसरून चित्रपट पाहू लागलो.आजकालच्या नीतीमत्ताशून्य जगाचे, पैशासाठी कुठलाही गुन्हा सहजपणे करणार्या जगताचे प्रभावी पण रंजक चित्रण चित्रपटात केले आहे. एक सोफीचे पात्र जे राधिका आपटेने केलेय ते सोडले तर बाकी कोणीच सरळ दिसत नाहीत. राधिकाचा अभिनय उत्तम. विशेष नीतीमत्ता नसलेल्या सीमीचे पात्र टब्बूने उत्कृष्ट रंगवले आहे. आकाशचे मुख्य पात्र आयुष्मानने फार सुंदर केले आहे. चित्रपटात पियानोचे छान पीसेस आहेत व एक दोन गाणीही खूप चांगली आहेत. एकामागोमाग एक घटना वेगाने घडत जातात व आपण त्यात हरवून जातो. एक भयानक डाॅक्टरचे पात्र आहे. हा डाॅक्टर आहे की खाटिक असा प्रश्न पडतो. सिनेमाचा शेवट पण अगदी खास आहे. तर जरूर बघावा असा हा चित्रपट आहे.
रविंद्र शेणोलीकर

Comments
Post a Comment