दगड

आता दगड झाले हे मन
कल्पनेचे झरे आटले
प्रतिभेचे पंखही थकले
सुटती दैनंदिनीचे पाश न
आता दगड झाले हे मन

बुद्धीचे चापल्य हरवले
ईर्षेचे अंगार निवाले
चैतन्याचे लोट हरपले
जडशीळ भासे सारे जीवन
आता दगड झाले हे मन

रवींद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava