कोलवा

परवाच गोव्यात आलो. एअरपोर्ट वरून कोलवा बीच जवळील रिझाॅर्टला जातानाच अगदी शांत, निवांत वाटू लागलं. ही शांती गोव्याच्या भूमीत, इथल्या हवेत व कणाकणात सामावलेली आहे असं वाटतं. रिझाॅर्टवर आमच्या रूमच्या बाल्कनीतून थोडा लांबवर समुद्र दिसतो. समुद्राची गाज स्पष्ट ऐकू येते. बाहेर पडले की दोन मिनिटात बीचवर जाता येते.

आज कुठे धावपळ न करता रूमवरच राहायचे ठरवले. व्यंकटेश माडगुळकरांचे 'चित्रे आणि चरित्रे' शांत वातावरणात वाचायला खूप मजा येत आहे. त्यांचे 'बनगरवाडी' मित्राने वाचायला दिले होते. मी विशेष उत्सुक नव्हतो. मी कायम शहरात वास्तव्य केले असल्याने ग्रामीण पार्श्वभूमीचे पुस्तक मला आवडणार नाही असे समजत होतो. बनगरवाडी हातात घेतले ते संपेपर्यंत खाली ठेवले नाही. हे त्यांचे दुसरे पुस्तक वाचतोय व बहुदा त्यांची बरीचशी पुस्तके वाचल्याशीवाय चैन पडणार नाही.

गोव्याला आधी बर्‍याचदा आलो आहे व बरेच फिरलो आहे. यापुढे असेच समुद्राजवळच्या रिझाॅर्टवर येऊन रहावे, बीचवर फिरावे व वाचन-लेखन करावे असे वाटू लागले आहे.

रविंद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava