Dark
एक तर सगळी पात्रे व त्यांचे नातेसंबंध लक्षात यायला बरेच एपिसोड गेले. पण मी मुलाला अधूनमधून विचारत राहिलो. ह्याची कथा
टाइम ट्रॅवल वर आधारित आहे. तेहतीस वर्षांचे चक्र मानले आहे. माणसे गायब होतात, तेहतीस वर्षे मागे किंवा पुढे जातात.
कधीकधी सहासष्ट वर्षे मागे जातात. परत वर्तमानात येतात. असे सगळे चालू राहते. अॅडम व ईव्ह ही दोन स्वतंत्र विश्वे
असतात.पण त्यांचा संयोग होतो व दु:खांची मालिका सुरू होते. ह्याना पुन्हा विलग केल्याशिवाय ही दु:खे संपणार नाहीत अशी
अॅडमची धारणा असते. ईव्ह त्याच्याशी सहमत नसते. अशी साधारण पार्श्वभूमी आहे. अद्भुत गोष्टी घडत जातात. काळ
झपाट्याने शंभर वर्षात फिरत राहतो. एक वेगळेच आकर्षण मनाचा ठाव घेत राहते. ह्यात भौतिकशास्त्रातले बरेच उल्लेख येत
राहतात. आइनस्टाइन, श्रॉडिंगर व त्याची मांजर, कृष्णविवरे ई. उल्लेख आहेत. एकूण तुम्हाला विमूढ करून टाकणारी, चक्रावून
टाकणारी अशी ही सीरीज आहे. फार सुंदर असे शीर्षक गीत आहे. आरामशीर काही पाहायचे असेल तर हीच्या फंदात पडू नका.
पण गूढाचे, विस्मयकारक घटनांचे आकर्षण असेल तर बघितल्याशिवाय राहू नका.
Comments
Post a Comment