आषाढ
पाऊस आषाढाचा । कोसळे सृष्टीवर
गडगडते अंबर । उच्चरवे ।।
पाहता सभोवार । चिंब हिरवाई ।
धुंद झाली भुई । जलधारांनी ।।
आनंदाची सीमा । नाचतो मयुर ।
निसर्ग मल्हार । आळवतो ।।
जल वर्षावात । भिजे पानपान ।
जाहला बेभान । महासागर ।।
आषाढरंगी । रंगले जीवन ।
उचंबळे मन । क्षणोक्षणी ।।
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment