दुसरी बाजू

 सह्याद्री चॅनलवर "दुसरी बाजू" असे शीर्षक असलेल्या कार्यक्रमाचे शंभरहून अधिक एपिसोड झालेत. यू ट्यूबवर ते पाहायला मिळतात. आपल्या आवडत्या कलाकारांबद्दल अधिक माहिती मिळते. त्यांचे बालपण, शिक्षण, तारूण्य, कलाक्षेत्रातील प्रवेश वगैरे वेगवेगळे कंगोरे समोर येतात. काल मी इला भाटे वरचा विक्रम गोखलेनी अँकर केलेला कार्यक्रम पाहिला. त्या दहावीला बोर्डात मेरिट लिस्टमध्ये आल्या होत्या हे ऐकून नवल वाटले. त्यांचे बालपण, शिक्षण पार्ल्यात गेले. पार्ले टिळकच्या त्या विद्यार्थिनी. पण पुढे सायन्स घेऊन फारशा चमकल्या नाहीत. नाट्यक्षेत्रात त्यांनी बराच उशीरा प्रवेश केला. पण तिथे त्या रमल्या व खूप प्रसिद्धी व नावलौकिक मिळवला.

मुलाखत अशी रंगत गेली. विक्रम त्यांना मोकळेपणी बोलून देत होते. इला भाटेंची मुलगी सुद्धा दहावीला बोर्डात मेरिटमध्ये आली. पुढे डाॅक्टरेट मिळवली. त्यांचे पती सुद्धा डाॅक्टर आहेत.

नंतर मी विजया मेहतांवरचा कार्यक्रम पाहिला. त्यांच्याबद्दल काय बोलावे? रंगायनची चळवळ, नंतर व्यावसायिक रंगभूमीवर प्रवेश, आंतरराष्ट्रीय नाट्यशिक्षण व अनुभव असं कितीतरी सांगत होत्या. मराठी कलाकारांवर प्रेम असणार्‍या सर्वांनी दुसरी बाजूचे कार्यक्रम अवश्य पाहावेत. 

रवींद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava