आपडी थापडी
ह्या चित्रपटात श्रेयस तळपदे व मुक्ता बर्वे प्रमुख कलाकार आहेत. सोबत संदीप पाठक आहे. श्रेयस सखाराम पाटलाच्या भूमिकेत आहे. मुक्ता त्याची पत्नी. सखाराम अतिशय कंजूष व्यक्ती आहे. एकेक पैसा कसा वाचवता येईल ह्याचीच त्याला चिंता असते. त्याच्या घरी लहानपणापासून दामू (संदीप पाठक) आश्रीत म्हणून राहात असतो. पाटलाची छोटी मुलगी माऊ. त्यांच्या घरी पिंकू नावाचे बकरीचे पिल्लू असतं. माऊचा पिंकूवर फार जीव असतो. पिंकू तीन तीन दिवस काही खात नाही म्हणून मोफत उपचार करून घेण्यासाठी पाटील व दामू पिंकूला घेऊन मुंबईत येतात. टी.सी. पकडणार म्हणून ते पिंकूला स्टेशनवरच सोडून पळून जातात. पाटील घरी परत येऊन बायकोला बाता मारतात. पिंकू दिसत नाही म्हणून माऊ नाराज होते. पिंकूला रेल्वेत जमा केले जाते. पिंकूच्या लिलावाच्या दिवशी पाटील बाईचा वेश घालून लिलावात जातात. शेवटी पिंकूला घरी आणण्यात पाटील यशस्वी होतात व माऊच्या चेहर्यावर हसू फुटते.
श्रेयस, मुक्ता व संदीप पाठक यांनी सफाईदार अभिनय केला आहेः चित्रपट विनोदी ढंगाचा आहे.
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment