वृंदावनी सारंग
शनिवारची सुट्टी आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. कामाच्या दिवशी नकोसा वाटणारा पाऊस सुट्टीच्या दिवशी हवाहवासा वाटतो. वातावरण थंड होते. दुपारी जेवण करून मस्त गुरफटून झोपायचं व चार वाजता उठून कडक चहा प्यायचा.
पण आज जेवणानंतर वृंदावनी सारंग ऐकायची तल्लफ आली. दुपारच्या वेळी गायला जाणारा हा काफी थाटातील राग. जसा भीमपलास आवडतो तसेच मला सारंग रागाचेही सर्व प्रकार आवडतात. पण वृंदावनी खास करून. यू ट्यूबवर पं. भीमसेन जोशींचा ४२ मिनिटांचा वृंदावनी सारंग ऐकला आणि मन तृप्त झाले.
हे राग कोणी कधी बनवले काहीच कल्पना नाही. गेल्या शतकात अनेक प्रतिभावंत कलाकारांनी नवीन राग बनवले, बनवण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर पारंपारिक रागांच्या ताकदीचा एकही नवीन राग कोणी बनवू शकलेलं नाही. हे राग ज्यांनी निर्माण केले त्यांना मनापासून प्रणाम.
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment