हे सर्व कशासाठी ?

परवा स्टेशनवर संध्याकाळी रिक्षेच्या रांगेत उभा होतो. तेवढ्यात एक वॅन येऊन डाव्या बाजूला काही अंतरावर थांबली. पाच सहा पोलिस बाहेर पडले व एक स्ट्रेचर बाहेर आणून जमिनीवर ठेवण्यात आला. त्यावर सफेद कपड्यात पूर्णपणे आच्छादलेली बाॅडी होती. रांगेतले सर्वजण तिकडे बघू लागले. काही संबंध नसताही मन विषण्ण झाले.
आज एका पुस्तकात वाचलं,"सृष्टीत जीवन म्हणजे अपघात आहे व मृत्यू हाच नियम आहे". वाचून चांगलाच उडालो. असेच जर असेल तर जन्मापासून आपण जे जगतो, जमवतो, जपतो ते कशासाठी. कशाला ते हेवेदावे, अहंकार, मत्सर व चढाओढ. कशाला त्या काळज्या, ताणतणाव व भयाचे सावट. आयुष्य म्हणजे एका टूरवर आलो आहोत असं समजावं आणि प्रत्येक क्षण हे दान आहे असं समजून सत्कारणी लावावा.
मृत्यूच्या प्रत्यक्ष व शाब्दिक दर्शनाने कोणीतरी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे वाटले.

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava