Posts

Showing posts from August, 2018

The tropic of cancer

Just finished reading this book by Henry Miller. It depicts the daily struggle of a young author who has left his wife in America and come to live in Paris. Getting a square meal every day is his major worry. His astounding reflections on life are very bold and unique and had created quite a stir at the time. He makes friends along the way who are similarly placed and life moves on in the wonderful city of Paris. You don't know what to make of the book. You are nevertheless left with a feeling that it was a enjoyable read, quite exceptional and original. Ravindra Shenolikar

खोपटं

निसर्गाच्या कुशीत हवं एक खोपटं निळ्या आभाळाच्या खाली हुंदडावं एकटं श्वास भरभरून घ्यावा शुद्ध शीतल हवेचा डोंगरावर पाय रोवून वेध घ्यावा सृष्टीचा झर्‍याचं पाणी प्यावं, नदीमध्ये डुंबावं उंच उडी मारून फांदीवर लटकावं झुणका भाकर खावी, वर थोडं लोणी शांततेच्या तंबोर्‍यावर ऐकावी निसर्गगाणी सांजवेळी पश्चिमेला लाल तांबूस छटा गार वार्‍याची झुळुक, अंधारल्या वाटा निशेचा राजा उगवी घेऊन तार्‍यांचा थाट निद्रेतून जागं होता पुन्हा नवी पहाट                                                         

प्रेम

नको जवळीक इतकी की प्रेमही न दिसावे जीव लावावा इतका की कोणी गृहित धरावे कोणासाठी कोणी का इतके करावे प्रेमापायी कोणी जगावे अन् मरावे रवींद्र शेणोलीकर                  

वळण

खच्चून गर्दी, रेटारेट बसून जाण्यासाठी थेट जीवाचीही नाही पर्वा धडाड धडाड पडती उड्या कशासाठी, कोणासाठी जमवतोस इतके गड्या सृष्टीच्या ह्या चक्रामध्ये ढवळाढवळ करतोस वेड्या शोध जरा वेगळी वाट नवीन मार्ग नवी पहाट घे जरा वेगळे वळण का जगतोस रोजचे मरण तोडून टाक फसव्या बेड्या घे जरा मोकळा श्वास आटली विहिर, सरतोय काळ स्वत:स सांग "आता बास"                        रविंद्र शेणोलीकर

अनन्या

काही दिवसांपूर्वी 'अनन्या' हे नाटक पाहिले. नाटकाबद्दल काहीच माहित नव्हते. चला हवा येउ द्या वर ते अद्याप आले नव्हते. अपघातात हात गमावलेल्या एका तरूण, हुशार व जिद्दी मुलीचे ह्यात चित्रण आहे. अपार परिश्रम घेऊन ते ऋजुता बागवेने समर्थपणे केले आहे. रंगभूमीवर असा प्रयोग प्रथमच कोणी केला असेल. शाॅर्ट सर्किटचा प्रसंग, त्यातून आपल्या पायातील ताकदीची अनन्याला झालेली जाणीव, त्यातून तिने घेतलेली उभारी, तिची नंतरची जिद्द व संघर्ष, सर्वच बघण्यासारखे. रंगभूमीवर पायाने चादरीची घडी घालण्याच्या केवळ एका प्रसंगासाठी ऋतुजाला पारितोषिक द्यायला हवे. अप्रतिम नाटक.