अनन्या
काही दिवसांपूर्वी 'अनन्या' हे नाटक पाहिले. नाटकाबद्दल काहीच माहित नव्हते. चला हवा येउ द्या वर ते अद्याप आले नव्हते. अपघातात हात गमावलेल्या एका तरूण, हुशार व जिद्दी मुलीचे ह्यात चित्रण आहे. अपार परिश्रम घेऊन ते ऋजुता बागवेने समर्थपणे केले आहे. रंगभूमीवर असा प्रयोग प्रथमच कोणी केला असेल. शाॅर्ट सर्किटचा प्रसंग, त्यातून आपल्या पायातील ताकदीची अनन्याला झालेली जाणीव, त्यातून तिने घेतलेली उभारी, तिची नंतरची जिद्द व संघर्ष, सर्वच बघण्यासारखे. रंगभूमीवर पायाने चादरीची घडी घालण्याच्या केवळ एका प्रसंगासाठी ऋतुजाला पारितोषिक द्यायला हवे. अप्रतिम नाटक.
Comments
Post a Comment