वळण

खच्चून गर्दी, रेटारेट
बसून जाण्यासाठी थेट
जीवाचीही नाही पर्वा
धडाड धडाड पडती उड्या

कशासाठी, कोणासाठी
जमवतोस इतके गड्या
सृष्टीच्या ह्या चक्रामध्ये
ढवळाढवळ करतोस वेड्या

शोध जरा वेगळी वाट
नवीन मार्ग नवी पहाट
घे जरा वेगळे वळण
का जगतोस रोजचे मरण

तोडून टाक फसव्या बेड्या
घे जरा मोकळा श्वास
आटली विहिर, सरतोय काळ
स्वत:स सांग "आता बास"

                       रविंद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava