खोपटं
निसर्गाच्या कुशीत हवं एक खोपटं
निळ्या आभाळाच्या खाली हुंदडावं एकटं
श्वास भरभरून घ्यावा शुद्ध शीतल हवेचा
डोंगरावर पाय रोवून वेध घ्यावा सृष्टीचा
झर्याचं पाणी प्यावं, नदीमध्ये डुंबावं
उंच उडी मारून फांदीवर लटकावं
झुणका भाकर खावी, वर थोडं लोणी
शांततेच्या तंबोर्यावर ऐकावी निसर्गगाणी
सांजवेळी पश्चिमेला लाल तांबूस छटा
गार वार्याची झुळुक, अंधारल्या वाटा
निशेचा राजा उगवी घेऊन तार्यांचा थाट
निद्रेतून जागं होता पुन्हा नवी पहाट
Comments
Post a Comment