उरी, द सर्जिकल स्ट्राइक
कालच हा खुर्चीला खिळवून ठेवणारा चित्रपट पाहिला. अतिरेक्यांनी निद्रिस्त अवस्थेत असलेल्या आपल्या जवानांवर केलेल्या घातक हल्ल्याला दिलेल्या सडेतोड प्रत्युत्तराचे सुंदर चित्रण चित्रपटात दिसते. विकी कौशलने अप्रतिम काम केले आहे व तो आता मोठा स्टार होण्याच्या वाटेवर आहे असे म्हणायला हरकत नाही. परेश रावलचा अभिनय नेहमीप्रमाणे संयत व सुंदर. सर्जिकल स्ट्राइकचे संपूर्ण संयोजन, कृत्रिम उपग्रहांचा केलेला वापर, तंत्रज्ञानाचा वापर प्रत्यक्ष स्ट्राइकची दृश्ये हा सर्व भाग उत्तम प्रकारे दाखवला आहे. अॅक्शन सीन्समधले कॅमेरावर्क मात्र थोडे खटकले. कॅमेरा इतका अस्थिर आहे की डोळ्यांवर ताण येतो.
इतर कलाकारांची कामेही छान.यामी गौतमचा अभिनय चांगला व दिसतेही छान. मोदी, पर्रिकर हुबेहुब उभे केलेत. खूप वर्षांनंतर स्वरूप संपतला पडद्यावर पाहिले. तिचाही अभिनय चांगलाच. तिच्या पूर्वीच्या टीव्ही सिरियल्स अजुनही आठवतात.
चित्रपट तिकिटबारीवर जोरात चालू आहे व अवश्य बघावा असा आहे.
रविंद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment