वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली
वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली लेखिका - नसरीन मुन्नी कबीर अनुवाद - मिलिंद चंपानेरकर सुप्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रेहमानशी केलेल्या संवादावर, चर्चेवर आधारित "काॅन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान" हे इंग्रजी पुस्तक लेखिका नसरीन मुन्नी कबीर ह्यांनी लिहिले. त्याच पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी हा मराठी अनुवाद केला आहे. वहिदाच्या लाखो चाहत्यांनी अगदी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. 'प्यासा', 'गाइड', 'तीसरी कसम', 'खामोशी' आदी चित्रपटांतून आव्हानात्मक भूमिका साकार करणार्या वहिदाने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. तिच्या कारकिर्दीतले वेगवेगळे चित्रपट कसे घडले ह्याच्या पडद्यामागच्या रंजक कहाण्या वहिदाने मोकळेपणी ह्या संवादांमध्ये सांगितल्या आहेत. तिचा स्वत:चा चित्रपटसृष्टीतील प्रवास ह्या संवादांच्या ओघात आपल्याला समजत जातो. जुन्या हिंदी चित्रपटांच्या शौकिनांनी व वहिदाच्या चाहत्यांनी जरूर वाचावे असे पुस्तक. रवींद्र शेणोलीकर