झेन गार्डन
झेन गार्डन
लेखक - मिलिंद बोकिल
ह्या कथासंग्रहात मिलिंद बोकिलांच्या खास बांधून ठेवणार्या शैलीत लिहिलेल्या विविध विषयांवरच्या कथा आहेत. "यंत्र" ही कथा बिघडलेल्या यंत्राशी झगडणार्या नायकाची व तो ज्या मनोवस्थांतून जातो त्याबद्दल आहे. वाचताना आपल्या डोळ्यांसमोर तो कारखाना, त्यातली माणसे, ते बिघडलेले यंत्र उभे राहते. "निरोप" ह्या कथेत एका दूरवरच्या आदिवासींच्या गावात दोन वर्षे राहून नायकाने केलेले काम, तिथली माणसे व त्यांच्याशी जुळलेले ऋणानुबंध व आता पत्नीच्या आग्रहाखातर मुंबईला परत जाण्याचा घेतलेला निर्णय व गावकर्यांचा निरोप घेण्यासाठी गावाला दिलेली शेवटची भेट हे सर्व चटका लावून जाते."साथिन" ही कथा महिलांवर होणारे अत्याचार व त्याविरूद्ध लढणारी साथिन ही संघटना, त्या संघटनेचे एका शिबीरास कथेची नायिका तिच्या मैत्रिणीबरोबर जाते व तिथे तिला भेटलेल्या महिला, घडलेल्या चर्चा व त्यामुळे तिच्या विचारांवर होणारा परिणाम हे सर्व फार सुंदर लिहिले आहे. झेन गार्डन ही कथा एका अशा गार्डन बद्दल आहे जी सहज बघता पूर्णपणे मोकळी दिसते. प्रत्येक जण त्या गार्डनचा आपल्या पद्धतीने अर्थ लावतो. वेगवेगळ्या विषयांवरच्या कथांचा हा संग्रह जरूर वाचावा असा आहे.
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment