आज अचानक गाठ पडे

 

आज अचानक गांठ पडे

मित्र का हा सदा रडे?


कधी न पाहिला चेहरा हसरा

सदैव आपुला कष्टी, दुखरा

असे का बरे, न सुटे कोडे


कोण लागले ह्याच्या पाठी

कपाळावर कायम आठी

दैवगती का अशी नडे


प्रेमभंग तर झाला नाही?

पैशासाठी अडले काही?

यशास ह्याचे का वावडे?


मित्र विनविती देवाला

एकदा तरी हसवा ह्याला

मिळुनी सर्व घालती साकडे


रवींद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

Anna Karenina Musical

गोल्डा - एक अशांत वादळ