मधमाद सारंग



मधमाद सारंग 

हा सारंग....

समुद्राच्या लाटांप्रमाणे

उसळवतो ह्रदयात

अनंत आठवणी

विस्मृतीत गेलेल्या क्षणांच्या

एक चित्रपट

कासावीस करणारा

तरळू लागतो मन:चक्षूंसमोर

असं वाटतं हे सूर सांगताहेत

अनंत काळापासूनचा इतिहास

माझ्या आयुष्याची क्षणचित्रे

हे केवळ एक माध्यम

पण कथा मात्र 

अवघ्या मानवजातीची

वेदनेची, संघर्षाची

हातातून निसटणार्‍या क्षणांची

अपरिहार्य क्षणभंगूरतेची

तरीसुद्धा हा सारंग

ओढत राहतो पुन:पुन्हा

करत राहतो घायाळ


रवींद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

The world of Haiku

Operation Safed Sagar