फक्त चोवीस तास
फक्त चोवीस तास नाही पुरत फक्त चोवीस तास दिवसात अठ्ठे चाळीस तास तरी हवेत इतके काही करायचे असते.... वाचायचे असते, लिहायचे असते पाहायचे असते, अभ्यासायचे असते पण हां हां म्हणता संध्याकाळ होते अंधार पडतो, दिवेलागण होते बघता बघता सामसूम होऊ लागते घराघरातील दिवे मालवू लागतात वाचताना डोळ्यांवर झापड येते शब्दांचे अर्थ कळेनासे होतात शरीर दमून, थकून जाते आणि शरणागती घेत हे स्वीकारावे लागते की अजून एक दिवस संपला आहे रवींद्र शेणोलीकर