प्राणायाम
श्वास घ्या व श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासाकडे द्या. मनात आणि कुठले विचार नकोत. श्वास घ्या व हळूहळू श्वास सोडा. सुरेशराव त्याप्रमाणे करत होते. तेवढ्यात त्यांना आठवले, जाताना भाजी घेऊन जायचे आहे. बायकोने बजावले आहे. अरे, हे काय मनात आले! श्वास घ्या, श्वास सोडा. दुसरे विचार नकोत. पण आज संध्याकाळची सोसायटीतली सभा मात्र चांगलीच गाजणार. पार्किंगचा प्रश्न अगदी ज्वलंत झालाय. पण ते जाऊदे. श्वास घ्या, श्वास सोडा. चिरंजीवांची परिक्षा आठवड्यावर येऊन ठेपली. पण अभ्यासाचे नाव नाही. ऐनवेळी रात्री जागवणार. अरे, पुन्हा भरकटलो. काॅन्सनट्रेट. श्वास घ्या, श्वास सोडा. त्या कुलकर्ण्याला मेमो दिला पाहिजे. काही काम करत नाही. दिवसभर इकडे तिकडे टाइमपास करत फिरतो. चचच. काय हे. कशाला आलोय इथे? लक्ष दे नीट. श्वास घ्या, श्वास सोडा. मनात कुठलेही विचार नकोत.