स्वर
स्वर
होता जरी तो सवेच माझ्या
गवसला न मज कधी आजवर
जरी जाणवे त्याचे असणे
उपेक्षिला मी त्यास निरंतर
तरीही न रूसला माझ्यावर तो
वाट पाही जणू विठू विटेवर
अवचित एकदा येता कंठी
ह्रदयी माझ्या आला गहिवर
आनंदाच्या विशाल गगनी
होऊ लागला माझा वावर
जेव्हा अखेर मी आळवला
गोठवलेला माझा हा स्वर
होता जरी तो सवेच माझ्या
गवसला न मज कधी आजवर
जरी जाणवे त्याचे असणे
उपेक्षिला मी त्यास निरंतर
तरीही न रूसला माझ्यावर तो
वाट पाही जणू विठू विटेवर
अवचित एकदा येता कंठी
ह्रदयी माझ्या आला गहिवर
आनंदाच्या विशाल गगनी
होऊ लागला माझा वावर
जेव्हा अखेर मी आळवला
गोठवलेला माझा हा स्वर
Comments
Post a Comment