Posts

Showing posts from 2020

Best teacher

Ranjitsingh Disale from India won an International teacher's award of one million dollars. All Indians must be proud of this exceptional achievement. What is still more creditable is his decision to share half of the prize money with other nominees who could not win. This too has never happened before. Disale has worked in rural areas. He brought great innovation into teaching. He has used the digital media and QR code to give a wide coverage to his classes. His lectures are available in more than 10 countries. It is a phenomenal achievement. Ravindra Shenolikar

Dark

Image
ही वेब सीरीज नेटफ्लिक्स वर तीन सीझन्स मध्ये पाहायला मिळेल. माझ्या मुलांनी खूप त्याचे वर्णन केले. सुरूवातीपासून शेवटपर्यंत  बुचकळ्यात टाकणारी गूढ अशी ही सीरीज आहे. एक तर सगळी पात्रे व त्यांचे नातेसंबंध लक्षात यायला बरेच एपिसोड गेले. पण मी मुलाला अधूनमधून विचारत राहिलो. ह्याची कथा  टाइम ट्रॅवल वर आधारित आहे. तेहतीस वर्षांचे चक्र मानले आहे. माणसे गायब होतात, तेहतीस वर्षे मागे किंवा पुढे जातात.  कधीकधी सहासष्ट वर्षे मागे जातात. परत वर्तमानात येतात. असे सगळे चालू राहते. अॅडम व ई व्ह ही दोन स्वतंत्र विश्वे  असतात.पण त्यांचा  संयोग होतो व दु:खांची मालिका सुरू होते. ह्याना पुन्हा विलग केल्याशिवाय ही दु:खे संपणार नाहीत अशी  अॅडमची धारणा असते.  ईव्ह त्याच्याशी सहमत नसते. अशी साधारण पार्श्वभूमी आहे. अद्भुत गोष्टी घडत जातात. काळ  झपाट्याने शंभर वर्षात फिरत राहतो.  एक वेगळेच आकर्षण मनाचा ठाव घेत राहते. ह्यात भौतिकशास्त्रातले बरेच उल्लेख येत  राहतात. आइनस्टाइन, श्रॉडिंगर व त्याची  मांजर, कृष्णविवरे ई. उल्लेख आहेत. एकूण तुम्हाला विमूढ करून टाकणारी...

The restaurant

Finally restaurants and bars have been permitted to open with 33% capacity upto 10 p.m. I immediately called two of my friends and we met in the restaurant, after a gap of more than six months. It is our favourite place where you get good sea food and relaxed atmosphere. Generally, the people who gather there are of the same type, who love to meet friends and chat over a glass of beer or whisky with sea food. The chat is very general in nature, of this and that, the travels undertaken, current issues but the joy is of meeting your old buddies to spend a nice evening. We met and ordered drinks and food. The next three hours just flew. I don't remember what we talked about for so long. One of the friends had visited Murud, a coastal town near Alibaug and he talked of that. Other friend talked briefly about his business, the problems of labour etc. It was incessant talking without any awkward pause, as it should be with friends. Very soon we realised that the closing time was fast app...

वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली

 वहिदा रेहमान...हितगुजातून उलगडलेली लेखिका - नसरीन मुन्नी कबीर अनुवाद - मिलिंद चंपानेरकर सुप्रसिद्ध अभिनेत्री वहिदा रेहमानशी केलेल्या संवादावर, चर्चेवर आधारित "काॅन्व्हर्सेशन्स विथ वहिदा रेहमान" हे इंग्रजी पुस्तक लेखिका नसरीन मुन्नी कबीर ह्यांनी लिहिले. त्याच पुस्तकाचा मिलिंद चंपानेरकर यांनी हा मराठी अनुवाद केला आहे. वहिदाच्या लाखो चाहत्यांनी अगदी वाचलेच पाहिजे असे हे पुस्तक आहे. 'प्यासा', 'गाइड', 'तीसरी कसम', 'खामोशी' आदी चित्रपटांतून आव्हानात्मक भूमिका साकार करणार्‍या वहिदाने चित्रपटसृष्टीत आपलं विशेष स्थान निर्माण केलं. तिच्या कारकिर्दीतले वेगवेगळे चित्रपट कसे घडले ह्याच्या पडद्यामागच्या रंजक कहाण्या वहिदाने मोकळेपणी ह्या संवादांमध्ये सांगितल्या आहेत. तिचा स्वत:चा चित्रपटसृष्टीतील प्रवास ह्या संवादांच्या ओघात आपल्याला समजत जातो. जुन्या हिंदी चित्रपटांच्या शौकिनांनी व वहिदाच्या चाहत्यांनी जरूर वाचावे असे पुस्तक. रवींद्र शेणोलीकर

झेन गार्डन

 झेन गार्डन  लेखक - मिलिंद बोकिल ह्या कथासंग्रहात मिलिंद बोकिलांच्या खास बांधून ठेवणार्‍या शैलीत लिहिलेल्या विविध विषयांवरच्या कथा आहेत. "यंत्र" ही कथा बिघडलेल्या यंत्राशी झगडणार्‍या नायकाची व तो ज्या मनोवस्थांतून जातो त्याबद्दल आहे. वाचताना आपल्या डोळ्यांसमोर तो कारखाना, त्यातली माणसे, ते बिघडलेले यंत्र उभे राहते. "निरोप" ह्या कथेत एका दूरवरच्या आदिवासींच्या गावात दोन वर्षे राहून नायकाने केलेले काम, तिथली माणसे व त्यांच्याशी जुळलेले ऋणानुबंध व आता पत्नीच्या आग्रहाखातर मुंबईला परत जाण्याचा घेतलेला निर्णय व गावकर्‍यांचा निरोप घेण्यासाठी गावाला दिलेली शेवटची भेट हे सर्व चटका लावून जाते."साथिन" ही कथा महिलांवर होणारे अत्याचार व त्याविरूद्ध लढणारी साथिन ही संघटना, त्या संघटनेचे एका शिबीरास कथेची नायिका तिच्या मैत्रिणीबरोबर जाते व तिथे तिला भेटलेल्या महिला, घडलेल्या चर्चा व त्यामुळे तिच्या विचारांवर होणारा परिणाम हे सर्व फार सुंदर लिहिले आहे. झेन गार्डन ही कथा एका अशा गार्डन बद्दल आहे जी सहज बघता पूर्णपणे मोकळी दिसते. प्रत्येक जण त्या गार्डनचा आपल्या पद्धतीने अ...

आज अचानक गाठ पडे

  आज अचानक गांठ पडे मित्र का हा सदा रडे? कधी न पाहिला चेहरा हसरा सदैव आपुला कष्टी, दुखरा असे का बरे, न सुटे कोडे कोण लागले ह्याच्या पाठी कपाळावर कायम आठी दैवगती का अशी नडे प्रेमभंग तर झाला नाही? पैशासाठी अडले काही? यशास ह्याचे का वावडे? मित्र विनविती देवाला एकदा तरी हसवा ह्याला मिळुनी सर्व घालती साकडे रवींद्र शेणोलीकर

When you are around

 When you are around the morning comes with abundance of energy And promise of future When you are around the sadness of evening goes unnoticed as  light fades into dark When you are around the night does not scare and I sleep with the assurance Of a beautiful dawn Ravindra Shenolikar

आश्रम

 आश्रम ह्या वेब सीरीजचा पहिला सीझन नुकताच पाहिला. दुसरा सीझन यायचा आहे. बाबा निराला नामक एका ढोंगी, भ्रष्टाचारी बाबाची ही कथा आहे. अंधश्रद्धा, भोळसटपणा ह्यांचे भांडवल करून लोकांना फसवणार्‍या, नादी लावणार्‍या बाबाची भूमिका बाॅबी देओलने फार छान केली आहे. ह्या बाबाचे लाखो भक्त व त्यातून त्याला मिळालेली पाॅवर, राजकीय हितसंबंध, बेकायदेशीर धंदे, खून, बलात्कार, शोषण अशा सर्व गोष्टींमुळे ही सीरीज रंगत जाते. मागासवर्गीय म्हणून होणारा अन्याय सहन न होऊन कुस्ती खेळण्यात तरबेज असलेली पम्मी आश्रमात राहायला येते. बाबाच्या बाह्य दर्शनाने प्रभावित होऊन ती बाबाची निस्सीम भक्त होते व साध्वी होऊन समाजसेवा करण्याचा निर्णय घेते. आदिती पोहनकरने ही भूमिका फार छान वठवली आहे. पम्मीचा भाऊ सत्तीची भूमिका राहुल पांडेने केली आहे जो छिचोरे चित्रपटात यापुर्वी दिसला आहे. त्याच्या पत्नीची भूमिका त्रिधा चौधरीने केली आहे. बाबाच्या गुन्ह्यांचा तपास करणार्‍या तडफदार पोलिस अधिकार्‍याची भूमिका दर्शन कुमार ह्याने तर त्याला साथ देणार्‍या डाॅ. नताशाची भूमिका अनुप्रिया गोएंका हिने केली आहे. अनुप्रिया बाॅलिवुडच्या काही चित्रप...