Posts

Showing posts from September, 2018

The festival

devotional music blares out beside a pandal that hides an idol puffing for air big show, lot at stake party, image, politics long queues outside seeking blessings the common man prays for a job for his son a suitor for his daughter for his early promotion Ravindra Shenolikar

Thoughtless

Sitting still, not trying to think. Else thought will take me backward or forward, down this lane and that. Let the water not get turbid. Thought is the first force to wreck your mind. Block it, unfriend it. Focus on your breathing. Breath in, breath out. Be positive they say. Why? Why not just be. Put everything into the thing at hand. It alone will give you joy, for its own sake, unqualified.  Ravindra Shenolikar

स्त्री

काल रात्री ११ च्या शो ला 'स्त्री' हा चित्रपट पाहिला. हाॅरर काॅमेडी असा एक वेगळाच जाॅनर ह्या चित्रपटाने निर्माण केलाय असे म्हणायला हरकत नाही. खूप वर्षांनी तीन दिवसात दोन चित्रपट पाहिले. काॅलेजच्या दिवसात हा रेट असायचा. तेव्हा शम्मी कपूर व देव आनंदचे चित्रपट किंवा रफीची गाणी असलेले कुठलेही चित्रपट....मग त्यात भारत भूषण असो, प्रदीप कुमार असो वा राजेंद्र कुमार असो.....आम्ही पाहायला जायचो. रफीच्या गाण्यांची मोहिनी मनावर होती. आजही ती गाणी तितकीच आवडतात. रात्री दोनला झोपलो. छान झोप लागली. कुणी स्त्री वगैरे स्वप्नात आली नाही. सकाळी आठला उठून पटापट आवरून कामावर गेलो. 'स्त्री'चा रिव्ह्यू काय देणार! बघा, पोटभर हसा आणि परत या. रविंद्र शेणोलीकर

मनमर्झियाँ

आजच प्रदर्शित झालेला 'मनमर्झियाँ' हा चित्रपट पाहिला. अगदीच टुकार असा हा अनुराग कश्यपचा चित्रपट पाहून डोकं दुखायला लागलं. चित्रपटात पंजाबी भाषा व हेल इतका वापरला आहे की हिंदी चित्रपट आहे की पंजाबी असेच वाटावे. रूमी व विकी ह्या दोन वेडसर पात्रांचा चित्रपटभर हैदोस आहे. त्यातल्यात्यात अभिषेकला बर्‍याच दिवसांनी पडद्यावर बघून बरे वाटले. तापसीचा अभिनय चांगला झाला आहे. सर्वच गाणी पंजाबी टाइपची आणि भिकार आहेत. ज्या भागात ही कथा घडते तो अगदी बकाल दाखवला आहे. बघण्यासारखे ह्या चित्रपटात काहीच नाही. पुन्हापुन्हा तेच ते प्रसंग दाखवून चित्रपटाची लांबी उगाच वाढवली आहे. बहुधा अमृता प्रीतम ह्यांच्या कथेवर चित्रपट आधारित आहे. पण प्रयोग पूर्णपणे फसला आहे असेच म्हणावे लागेल. रविंद्र शेणोलीकर

अस्वच्छ, बेशिस्त

सोसायटीत वरच्या मजल्यावर राहणारे लोक वरून केसांची गुंतवळ, फुकट गेलेले अन्न अशा वस्तू खाली फेकतात. रस्त्यावर सिग्नल लाल असला तरी दोन सिग्नलच्या गॅपमध्ये बरेचसे दुचाकीस्वार पोलिस नाही असे बघून सटकतात. कारमधले चालक दरवाजा उघडून रस्त्यावर पिंक टाकून दरवाजा बंद करतात. समोरचे वाहन हलण्याची शक्यता नसून सुद्धा जोरजोरात हाॅर्न वाजवले जातात. ऐन गर्दीच्या वेळी एखादी मिरवणूक निघते व सर्व पब्लिकला वेठीला धरते. कुठलाही सण ध्वनीक्षेपकावर कानठळ्या बसवणारे संगीत लावून साजरा होतो. लोकलमध्ये प्रवासी प्लास्टिक मधल्या चिप्स, मूगडाळ, शेंगदाणे खातात व प्लास्टिक खिडकीतून, दरवाज्यातून फेकून देतात. रस्त्यावरची कचरा पेटी पूर्ण भरून आजूबाजूला कचरा सांडलेला असतो व दुर्गंधी पसरलेली असते. अर्धवट फुटलेले गतीरोधक वाहनांची वाट लावत असतात. कुठे एखादे मॅनहोल चुकुन उघडे राहिले असते. रविंद्र शेणोलीकर

मीपण

माझे वेडेपण माझे वेगळेपण माझे नखरे माझे मीपण बेधुंद मी बेभान मी अचाट मी अफाट मी स्वतंत्र मी अनिर्बंध मी अशक्य मी अतर्क्य मी मीपणाचे गीत माझे माझ्यामधेच रममाण मी रविंद्र शेणोलीकर

tc.gn

आज tc.gn हा मराठी चित्रपट पाहिला. पहिल्या क्षणापासून चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो, जरासुद्धा कंटाळवाणा होत नाही. विषय सध्याच्या युगास अनुरूप असा आहे. नवीन तंत्रज्ञानातून उद्भवणारे संभाव्य धोके, जुन्या व नव्या पिढीच्या विचारांतील अंतर, त्यामुळे होणारा विसंवाद व त्याचे दुष्परिणाम अशा पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडत जाते. महेश मांजरेकरांच्या देखरेखीत केलेला पोलिस तपास पटण्यासारखा आहे. मांजरेकरांनी भूमिका उत्तम प्रकारे व त्यांच्या वेगळ्या शैलीत छान केली आहे. सचिन खेडेकर व इरावती हर्षे यांचा संयत अभिनय चांगला झाला असला तरी इन्टेन्सिटीत थोडा कमी वाटला. विद्याधर जोशींचा मित्राचा रोल चांगला झाला आहे, त्याच्या पत्नीचा छोटासा रोल सुलेखा तळवलकरने केला आहे. पर्ण पेठे हिने सानिकाचा रोल चांगला निभावला आहे. आजच्या काळाचे व आजच्या काळज्यांचे अचूक दिग्दर्शन करणारा हा चित्रपट जरूर पहावा असा आहे. रविंद्र शेणोलीकर

माणुसकी

सत्यनिष्ठेच्या सायंकाळी सचोटीच्या शेवटश्वासात झुंजणारी, तडफडणारी तुरळक माणुसकी पर्णावरील दंवासमान पहाटेच्या धुक्याप्रमाणे निमिषार्धात निसटणारी पुसटशी माणुसकी स्वार्थाने, लालसेने लोभाने, आसक्तीने ओरबाडलेली, दुखावलेली विव्हळणारी माणुसकी उपजत पण विरळा मरणासन्न तरी चिरंजीव झगडणारी, न संपणारी चिकट, चिवट माणुसकी रवींद्र शेणोलीकर