अस्वच्छ, बेशिस्त

सोसायटीत वरच्या मजल्यावर राहणारे लोक वरून केसांची गुंतवळ, फुकट गेलेले अन्न अशा वस्तू खाली फेकतात. रस्त्यावर सिग्नल लाल असला तरी दोन सिग्नलच्या गॅपमध्ये बरेचसे दुचाकीस्वार पोलिस नाही असे बघून सटकतात. कारमधले चालक दरवाजा उघडून रस्त्यावर पिंक टाकून दरवाजा बंद करतात. समोरचे वाहन हलण्याची शक्यता नसून सुद्धा जोरजोरात हाॅर्न वाजवले जातात. ऐन गर्दीच्या वेळी एखादी मिरवणूक निघते व सर्व पब्लिकला वेठीला धरते. कुठलाही सण ध्वनीक्षेपकावर कानठळ्या बसवणारे संगीत लावून साजरा होतो. लोकलमध्ये प्रवासी प्लास्टिक मधल्या चिप्स, मूगडाळ, शेंगदाणे खातात व प्लास्टिक खिडकीतून, दरवाज्यातून फेकून देतात. रस्त्यावरची कचरा पेटी पूर्ण भरून आजूबाजूला कचरा सांडलेला असतो व दुर्गंधी पसरलेली असते. अर्धवट फुटलेले गतीरोधक वाहनांची वाट लावत असतात. कुठे एखादे मॅनहोल चुकुन उघडे राहिले असते.

रविंद्र शेणोलीकर

Comments

Popular posts from this blog

A visit to Madam Bedi

It ends with us

Chhava