tc.gn
आज tc.gn हा मराठी चित्रपट पाहिला. पहिल्या क्षणापासून चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो, जरासुद्धा कंटाळवाणा होत नाही. विषय सध्याच्या युगास अनुरूप असा आहे. नवीन तंत्रज्ञानातून उद्भवणारे संभाव्य धोके, जुन्या व नव्या पिढीच्या विचारांतील अंतर, त्यामुळे होणारा विसंवाद व त्याचे दुष्परिणाम अशा पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडत जाते. महेश मांजरेकरांच्या देखरेखीत केलेला पोलिस तपास पटण्यासारखा आहे. मांजरेकरांनी भूमिका उत्तम प्रकारे व त्यांच्या वेगळ्या शैलीत छान केली आहे.
सचिन खेडेकर व इरावती हर्षे यांचा संयत अभिनय चांगला झाला असला तरी इन्टेन्सिटीत थोडा कमी वाटला. विद्याधर जोशींचा मित्राचा रोल चांगला झाला आहे, त्याच्या पत्नीचा छोटासा रोल सुलेखा तळवलकरने केला आहे. पर्ण पेठे हिने सानिकाचा रोल चांगला निभावला आहे.
आजच्या काळाचे व आजच्या काळज्यांचे अचूक दिग्दर्शन करणारा हा चित्रपट जरूर पहावा असा आहे.
रविंद्र शेणोलीकर

Comments
Post a Comment