मनमर्झियाँ
आजच प्रदर्शित झालेला 'मनमर्झियाँ' हा चित्रपट पाहिला. अगदीच टुकार असा हा अनुराग कश्यपचा चित्रपट पाहून डोकं दुखायला लागलं. चित्रपटात पंजाबी भाषा व हेल इतका वापरला आहे की हिंदी चित्रपट आहे की पंजाबी असेच वाटावे. रूमी व विकी ह्या दोन वेडसर पात्रांचा चित्रपटभर हैदोस आहे. त्यातल्यात्यात अभिषेकला बर्याच दिवसांनी पडद्यावर बघून बरे वाटले. तापसीचा अभिनय चांगला झाला आहे. सर्वच गाणी पंजाबी टाइपची आणि भिकार आहेत. ज्या भागात ही कथा घडते तो अगदी बकाल दाखवला आहे. बघण्यासारखे ह्या चित्रपटात काहीच नाही. पुन्हापुन्हा तेच ते प्रसंग दाखवून चित्रपटाची लांबी उगाच वाढवली आहे. बहुधा अमृता प्रीतम ह्यांच्या कथेवर चित्रपट आधारित आहे. पण प्रयोग पूर्णपणे फसला आहे असेच म्हणावे लागेल.
रविंद्र शेणोलीकर
रविंद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment