माणुसकी
सत्यनिष्ठेच्या सायंकाळी
सचोटीच्या शेवटश्वासात
झुंजणारी, तडफडणारी
तुरळक माणुसकी
पर्णावरील दंवासमान
पहाटेच्या धुक्याप्रमाणे
निमिषार्धात निसटणारी
पुसटशी माणुसकी
स्वार्थाने, लालसेने
लोभाने, आसक्तीने
ओरबाडलेली, दुखावलेली
विव्हळणारी माणुसकी
उपजत पण विरळा
मरणासन्न तरी चिरंजीव
झगडणारी, न संपणारी
चिकट, चिवट माणुसकी
रवींद्र शेणोलीकर
Comments
Post a Comment