Posts

दुसरा वर्ग

गेल्या काही दिवसात लोकलचा प्रवास पहिल्या वर्गाने न करता दुसर्‍या वर्गानेच करू लागलो आहे. पास पहिल्या वर्गाचा. पण त्याचे ठराविक डबे हां हां म्हणता भरून जातात. दुसर्‍या वर्गाचे डबे जास्त, बसायला जागा मिळून जाते. मग पहिल्या वर्गातून उभ्याने कशाला जा. तर मला असं आढळून आलं की दुसर्‍या वर्गातून प्रवास करणारी माणसे पेहरावानी बरीचशी पहिल्या वर्गातल्या माणसांसारखीच आहेत. दुसर्‍या वर्गातली माणसे मोकळीढाकळी, हसतखेळत, गप्पा मारत प्रवास करणारी आहेत. सहसा आजकाल दुसर्‍या वर्गातही चौथी सीट कोणी क्लेम करत नाही. शक्य असेल तरच, नाहीतर सोडून देतात. ह्या माणसांमध्ये टाइमपास चांगला होतो, ती खूप जवळची वाटतात. त्यांच्यात माणुसकीचे दर्शन होत राहते. सायन-दादर पर्यंत उठून दुसर्‍याला बसायला जागा देतात. एखाद्याला उभे ठेऊन शेवटपर्यंत बसून राहात नाहीत. पहिल्या वर्गातली माणसे आढ्यताखोर, फारशी तडजोड न करणारी व स्वत:त मग्न असतात. कधीतरी होणारे भांडण सोडले तर इथे फारशी करमणूक होत नाही.

हे सर्व कशासाठी ?

परवा स्टेशनवर संध्याकाळी रिक्षेच्या रांगेत उभा होतो. तेवढ्यात एक वॅन येऊन डाव्या बाजूला काही अंतरावर थांबली. पाच सहा पोलिस बाहेर पडले व एक स्ट्रेचर बाहेर आणून जमिनीवर ठेवण्यात आला. त्यावर सफेद कपड्यात पूर्णपणे आच्छादलेली बाॅडी होती. रांगेतले सर्वजण तिकडे बघू लागले. काही संबंध नसताही मन विषण्ण झाले. आज एका पुस्तकात वाचलं,"सृष्टीत जीवन म्हणजे अपघात आहे व मृत्यू हाच नियम आहे". वाचून चांगलाच उडालो. असेच जर असेल तर जन्मापासून आपण जे जगतो, जमवतो, जपतो ते कशासाठी. कशाला ते हेवेदावे, अहंकार, मत्सर व चढाओढ. कशाला त्या काळज्या, ताणतणाव व भयाचे सावट. आयुष्य म्हणजे एका टूरवर आलो आहोत असं समजावं आणि प्रत्येक क्षण हे दान आहे असं समजून सत्कारणी लावावा. मृत्यूच्या प्रत्यक्ष व शाब्दिक दर्शनाने कोणीतरी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे वाटले.

Not fit enough

Today a blood donation camp had been organised during working hours. The blood was to be collected for children affected with thalassemia disorder. The donor conditions were accordingly very strict. No one taking medicine for hypertension or diabetes or any other ailment was allowed to donate. It was really pathetic that many willing donors above 40 and most above 50 were disqualified as they were on some treatment or other. The camp was successful only because of youngsters and seniors could only watch. This reflects how little importance is given to health in our society, particularly as the age advances. Indulgence is the order of the day and health is put on a back burner. We must change to a lifestyle in which healthy body and mind is given the utmost priority. It was heartening to see today that one British lady who happened to be around the premises at the time came forward to donate, was found fit to donate and donated blood with a smile on her face.

वृंदावनी सारंग

शनिवारची सुट्टी आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. कामाच्या दिवशी नकोसा वाटणारा पाऊस सुट्टीच्या दिवशी हवाहवासा वाटतो. वातावरण थंड होते. दुपारी जेवण करून मस्त गुरफटून झोपायचं व चार वाजता उठून कडक चहा प्यायचा. पण आज जेवणानंतर वृंदावनी सारंग ऐकायची तल्लफ आली. दुपारच्या वेळी गायला जाणारा हा काफी थाटातील राग. जसा भीमपलास आवडतो तसेच मला सारंग रागाचेही सर्व प्रकार आवडतात. पण वृंदावनी खास करून. यू ट्यूबवर पं. भीमसेन जोशींचा ४२ मिनिटांचा वृंदावनी सारंग ऐकला आणि मन तृप्त झाले. हे राग कोणी कधी बनवले काहीच कल्पना नाही. गेल्या शतकात अनेक प्रतिभावंत कलाकारांनी नवीन राग बनवले, बनवण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर पारंपारिक रागांच्या ताकदीचा एकही नवीन राग कोणी बनवू शकलेलं नाही. हे राग ज्यांनी निर्माण केले त्यांना मनापासून प्रणाम. रवींद्र शेणोलीकर

पाऊस

आता पाऊस जरा जरा लागला आहे. आभाळ भरले आहे. रिपरिप सुरू आहे. झाडे चिंब झालीयेत. पानांतून पाण्याचे थेंब टपकतायत. खाली छोटीछोटी तळी जमू लागली आहेत. मधूनच पावसाचा जोर वाढतो. आवाज वाढतो. हाॅलमधल्या ओट्यावर बसून मी ही सगळी गंमत बघतोय. कमालीचा आळस अंगात भरलाय. घराबाहेर पडावेसे वाटत नाहीये. अंतर्मुख करणारा हा पाऊस पाहात बसून रहावेसे वाटतेय. लहानपणी शाळा व पाऊस एकाच सुमारास जून महिन्यात सुरू व्हायचे. कोणीतरी शिक्षा केल्यासारखे वाटायचे. हुरहूर वाटायची. वर्ग बदलायचा, शिक्षक बदलायचे. मग हळूहळू नवीन वातावरणात रूळायला सुरूवात व्हायची. आजही पावसाळ्यात शाळेत जाणारी मुले पाहून ते दिवस आठवतात. त्या संमिश्र भावना आठवतात. पुन्हा एकदा शिकावेसे वाटते.

World Cup 2018

The world cup 2018 has taken off in Russia in a grand way. The games I have been lucky enough to watch so far were so clean, it was a joy to watch. The Spain vs Portugal game was incredible and the world saw the genius of Christiano Ronaldo. The Peru vs Denmark game was equally riveting with Peru losing despite overall dominance. I missed the Argentina Iceland game and it was a shock to know about Lio's missed penalty. Today Germany has lost to Mexico in a major upset. Now the Brazil vs Switzerland game is about to start shortly. This world cup is going to be awesome, one gets the feeling. Let's sit back and enjoy. While this is the scene on field, one can only imagine what must be going on around the places holding these games. There must be a frenzy around the venues with spectators having a time of their life. So many Indians have travelled to Russia even though India is not among the participating nations. With every kick-off the heart is just flying to Russia.

In the clouds....briefly

We set out on Saturday morning for a weekend at Lonavla. My family and my sister's. Just half an hour journey and we stopped at McDonald's for breakfast. They have egg and cheese muffins that I like. Feeling good we left and two hours later reached Lonavla. We were to stay at a bungalow which belongs to my sister's family friend. It is on amby valley road at a good altitude. A caretaker, a young boy of 25 years, looks after the upkeep and also prepares food. We had carried a lot of vegetables, eggs, bread and what not. The bungalow has a beautiful, expansive sit-out overlooking the valley below. The view is just magical. At any moment clouds start drifting in. You spend most of your time in the sit-out rather than inside the bungalow. For a still better view one can go onto the terrace. Sitting on the bench there and watching the scenery before you, one loses all track of time. The caretaker made sumptuous meal and we had a deep nap. It started raining in the evenin...