Posts

Showing posts from 2018

दगड

आता दगड झाले हे मन कल्पनेचे झरे आटले प्रतिभेचे पंखही थकले सुटती दैनंदिनीचे पाश न आता दगड झाले हे मन बुद्धीचे चापल्य हरवले ईर्षेचे अंगार निवाले चैतन्याचे लोट हरपले जडशीळ भासे सारे जीवन आता दगड झाले हे मन रवींद्र शेणोलीकर

The wait

The night is young Cool breeze blowing I wait under the bridge as water flows by If it is a yes She will come now Time moves slowly My eyes are on the path That will bring her to me I wait and wait As the world goes to sleep I remember her eyes Her nonstop chatter Her concern and care Her moods and tantrums I sit with utter sadness A journey of two years Ending so abruptly The night wears on I do not move As dawn sneaks in birds start chirping I hear someone running Calling out to me It is her, my sweetheart 'Sorry I am late' she says I take her in my arms Life begins.... Ravindra Shenolikar

अंधाधुन

'अंधाधुन' ची तिकिटे काढून चित्रपट बघायला गेलो. पोहोचायला उशीर झाला. शीर्षके दाखवत होते. आमच्या सीटवर कोणी दुसरेच बसले होते. कोणीही अटेन्डन्ट हजर नव्हता. खायचे पदार्थ घेऊन येणार्‍या एका माणसाला पकडले. त्याने काय चेक केले त्यालाच माहित पण आम्हाला सांगितले की त्या लोकांचे सेम सीट नंबर्स आहेत. जरा आवाज चढवल्यावर मॅनेजरकडे घेऊन गेला. मॅनेजर तत्परतेने आमच्या बरोबर सिनेमागृहात आला. आमची तिकिटे त्याने चेक केली होती. आमच्या सीटवर बसलेल्यांची तिकिटे पाहिली तर ती पुढच्या दिवशीची होती. ते लोक उठून हसतहसत निघून गेले. साॅरी वगैरे बोलण्याची तसदी त्यांनी घेतली नाही आमची दहा पंधरा मिनिटे वाया गेली. पण चित्रपटाने सुरूवातीपासूनच इतकी छान पकड घेतली की आम्ही झाला प्रकार विसरून चित्रपट पाहू लागलो.आजकालच्या नीतीमत्ताशून्य जगाचे, पैशासाठी कुठलाही गुन्हा सहजपणे करणार्‍या जगताचे प्रभावी पण रंजक चित्रण चित्रपटात केले आहे. एक सोफीचे पात्र जे राधिका आपटेने केलेय ते सोडले तर बाकी कोणीच सरळ दिसत नाहीत. राधिकाचा अभिनय उत्तम. विशेष नीतीमत्ता नसलेल्या सीमीचे पात्र टब्बूने उत्कृष्ट रंगवले आहे. आकाशचे मुख्य पात...

Bapu

We are small people Selfish hypocrites Greedy servants of never ending desire Going through life Trying to satiate little needs of this perishable body But..... Born this day was a simple frail man who strove all his life to conquer these demons Aspiring to things higher..... Winning freedom for us was Perhaps just a by-product Of his belief in Truth And non violent action Ravi Shenolikar

The festival

devotional music blares out beside a pandal that hides an idol puffing for air big show, lot at stake party, image, politics long queues outside seeking blessings the common man prays for a job for his son a suitor for his daughter for his early promotion Ravindra Shenolikar

Thoughtless

Sitting still, not trying to think. Else thought will take me backward or forward, down this lane and that. Let the water not get turbid. Thought is the first force to wreck your mind. Block it, unfriend it. Focus on your breathing. Breath in, breath out. Be positive they say. Why? Why not just be. Put everything into the thing at hand. It alone will give you joy, for its own sake, unqualified.  Ravindra Shenolikar

स्त्री

काल रात्री ११ च्या शो ला 'स्त्री' हा चित्रपट पाहिला. हाॅरर काॅमेडी असा एक वेगळाच जाॅनर ह्या चित्रपटाने निर्माण केलाय असे म्हणायला हरकत नाही. खूप वर्षांनी तीन दिवसात दोन चित्रपट पाहिले. काॅलेजच्या दिवसात हा रेट असायचा. तेव्हा शम्मी कपूर व देव आनंदचे चित्रपट किंवा रफीची गाणी असलेले कुठलेही चित्रपट....मग त्यात भारत भूषण असो, प्रदीप कुमार असो वा राजेंद्र कुमार असो.....आम्ही पाहायला जायचो. रफीच्या गाण्यांची मोहिनी मनावर होती. आजही ती गाणी तितकीच आवडतात. रात्री दोनला झोपलो. छान झोप लागली. कुणी स्त्री वगैरे स्वप्नात आली नाही. सकाळी आठला उठून पटापट आवरून कामावर गेलो. 'स्त्री'चा रिव्ह्यू काय देणार! बघा, पोटभर हसा आणि परत या. रविंद्र शेणोलीकर

मनमर्झियाँ

आजच प्रदर्शित झालेला 'मनमर्झियाँ' हा चित्रपट पाहिला. अगदीच टुकार असा हा अनुराग कश्यपचा चित्रपट पाहून डोकं दुखायला लागलं. चित्रपटात पंजाबी भाषा व हेल इतका वापरला आहे की हिंदी चित्रपट आहे की पंजाबी असेच वाटावे. रूमी व विकी ह्या दोन वेडसर पात्रांचा चित्रपटभर हैदोस आहे. त्यातल्यात्यात अभिषेकला बर्‍याच दिवसांनी पडद्यावर बघून बरे वाटले. तापसीचा अभिनय चांगला झाला आहे. सर्वच गाणी पंजाबी टाइपची आणि भिकार आहेत. ज्या भागात ही कथा घडते तो अगदी बकाल दाखवला आहे. बघण्यासारखे ह्या चित्रपटात काहीच नाही. पुन्हापुन्हा तेच ते प्रसंग दाखवून चित्रपटाची लांबी उगाच वाढवली आहे. बहुधा अमृता प्रीतम ह्यांच्या कथेवर चित्रपट आधारित आहे. पण प्रयोग पूर्णपणे फसला आहे असेच म्हणावे लागेल. रविंद्र शेणोलीकर

अस्वच्छ, बेशिस्त

सोसायटीत वरच्या मजल्यावर राहणारे लोक वरून केसांची गुंतवळ, फुकट गेलेले अन्न अशा वस्तू खाली फेकतात. रस्त्यावर सिग्नल लाल असला तरी दोन सिग्नलच्या गॅपमध्ये बरेचसे दुचाकीस्वार पोलिस नाही असे बघून सटकतात. कारमधले चालक दरवाजा उघडून रस्त्यावर पिंक टाकून दरवाजा बंद करतात. समोरचे वाहन हलण्याची शक्यता नसून सुद्धा जोरजोरात हाॅर्न वाजवले जातात. ऐन गर्दीच्या वेळी एखादी मिरवणूक निघते व सर्व पब्लिकला वेठीला धरते. कुठलाही सण ध्वनीक्षेपकावर कानठळ्या बसवणारे संगीत लावून साजरा होतो. लोकलमध्ये प्रवासी प्लास्टिक मधल्या चिप्स, मूगडाळ, शेंगदाणे खातात व प्लास्टिक खिडकीतून, दरवाज्यातून फेकून देतात. रस्त्यावरची कचरा पेटी पूर्ण भरून आजूबाजूला कचरा सांडलेला असतो व दुर्गंधी पसरलेली असते. अर्धवट फुटलेले गतीरोधक वाहनांची वाट लावत असतात. कुठे एखादे मॅनहोल चुकुन उघडे राहिले असते. रविंद्र शेणोलीकर

मीपण

माझे वेडेपण माझे वेगळेपण माझे नखरे माझे मीपण बेधुंद मी बेभान मी अचाट मी अफाट मी स्वतंत्र मी अनिर्बंध मी अशक्य मी अतर्क्य मी मीपणाचे गीत माझे माझ्यामधेच रममाण मी रविंद्र शेणोलीकर

tc.gn

आज tc.gn हा मराठी चित्रपट पाहिला. पहिल्या क्षणापासून चित्रपट आपल्याला खिळवून ठेवतो, जरासुद्धा कंटाळवाणा होत नाही. विषय सध्याच्या युगास अनुरूप असा आहे. नवीन तंत्रज्ञानातून उद्भवणारे संभाव्य धोके, जुन्या व नव्या पिढीच्या विचारांतील अंतर, त्यामुळे होणारा विसंवाद व त्याचे दुष्परिणाम अशा पार्श्वभूमीवर चित्रपटाची कथा उलगडत जाते. महेश मांजरेकरांच्या देखरेखीत केलेला पोलिस तपास पटण्यासारखा आहे. मांजरेकरांनी भूमिका उत्तम प्रकारे व त्यांच्या वेगळ्या शैलीत छान केली आहे. सचिन खेडेकर व इरावती हर्षे यांचा संयत अभिनय चांगला झाला असला तरी इन्टेन्सिटीत थोडा कमी वाटला. विद्याधर जोशींचा मित्राचा रोल चांगला झाला आहे, त्याच्या पत्नीचा छोटासा रोल सुलेखा तळवलकरने केला आहे. पर्ण पेठे हिने सानिकाचा रोल चांगला निभावला आहे. आजच्या काळाचे व आजच्या काळज्यांचे अचूक दिग्दर्शन करणारा हा चित्रपट जरूर पहावा असा आहे. रविंद्र शेणोलीकर

माणुसकी

सत्यनिष्ठेच्या सायंकाळी सचोटीच्या शेवटश्वासात झुंजणारी, तडफडणारी तुरळक माणुसकी पर्णावरील दंवासमान पहाटेच्या धुक्याप्रमाणे निमिषार्धात निसटणारी पुसटशी माणुसकी स्वार्थाने, लालसेने लोभाने, आसक्तीने ओरबाडलेली, दुखावलेली विव्हळणारी माणुसकी उपजत पण विरळा मरणासन्न तरी चिरंजीव झगडणारी, न संपणारी चिकट, चिवट माणुसकी रवींद्र शेणोलीकर            

The tropic of cancer

Just finished reading this book by Henry Miller. It depicts the daily struggle of a young author who has left his wife in America and come to live in Paris. Getting a square meal every day is his major worry. His astounding reflections on life are very bold and unique and had created quite a stir at the time. He makes friends along the way who are similarly placed and life moves on in the wonderful city of Paris. You don't know what to make of the book. You are nevertheless left with a feeling that it was a enjoyable read, quite exceptional and original. Ravindra Shenolikar

खोपटं

निसर्गाच्या कुशीत हवं एक खोपटं निळ्या आभाळाच्या खाली हुंदडावं एकटं श्वास भरभरून घ्यावा शुद्ध शीतल हवेचा डोंगरावर पाय रोवून वेध घ्यावा सृष्टीचा झर्‍याचं पाणी प्यावं, नदीमध्ये डुंबावं उंच उडी मारून फांदीवर लटकावं झुणका भाकर खावी, वर थोडं लोणी शांततेच्या तंबोर्‍यावर ऐकावी निसर्गगाणी सांजवेळी पश्चिमेला लाल तांबूस छटा गार वार्‍याची झुळुक, अंधारल्या वाटा निशेचा राजा उगवी घेऊन तार्‍यांचा थाट निद्रेतून जागं होता पुन्हा नवी पहाट                                                         

प्रेम

नको जवळीक इतकी की प्रेमही न दिसावे जीव लावावा इतका की कोणी गृहित धरावे कोणासाठी कोणी का इतके करावे प्रेमापायी कोणी जगावे अन् मरावे रवींद्र शेणोलीकर                  

वळण

खच्चून गर्दी, रेटारेट बसून जाण्यासाठी थेट जीवाचीही नाही पर्वा धडाड धडाड पडती उड्या कशासाठी, कोणासाठी जमवतोस इतके गड्या सृष्टीच्या ह्या चक्रामध्ये ढवळाढवळ करतोस वेड्या शोध जरा वेगळी वाट नवीन मार्ग नवी पहाट घे जरा वेगळे वळण का जगतोस रोजचे मरण तोडून टाक फसव्या बेड्या घे जरा मोकळा श्वास आटली विहिर, सरतोय काळ स्वत:स सांग "आता बास"                        रविंद्र शेणोलीकर

अनन्या

काही दिवसांपूर्वी 'अनन्या' हे नाटक पाहिले. नाटकाबद्दल काहीच माहित नव्हते. चला हवा येउ द्या वर ते अद्याप आले नव्हते. अपघातात हात गमावलेल्या एका तरूण, हुशार व जिद्दी मुलीचे ह्यात चित्रण आहे. अपार परिश्रम घेऊन ते ऋजुता बागवेने समर्थपणे केले आहे. रंगभूमीवर असा प्रयोग प्रथमच कोणी केला असेल. शाॅर्ट सर्किटचा प्रसंग, त्यातून आपल्या पायातील ताकदीची अनन्याला झालेली जाणीव, त्यातून तिने घेतलेली उभारी, तिची नंतरची जिद्द व संघर्ष, सर्वच बघण्यासारखे. रंगभूमीवर पायाने चादरीची घडी घालण्याच्या केवळ एका प्रसंगासाठी ऋतुजाला पारितोषिक द्यायला हवे. अप्रतिम नाटक.

दुसरा वर्ग

गेल्या काही दिवसात लोकलचा प्रवास पहिल्या वर्गाने न करता दुसर्‍या वर्गानेच करू लागलो आहे. पास पहिल्या वर्गाचा. पण त्याचे ठराविक डबे हां हां म्हणता भरून जातात. दुसर्‍या वर्गाचे डबे जास्त, बसायला जागा मिळून जाते. मग पहिल्या वर्गातून उभ्याने कशाला जा. तर मला असं आढळून आलं की दुसर्‍या वर्गातून प्रवास करणारी माणसे पेहरावानी बरीचशी पहिल्या वर्गातल्या माणसांसारखीच आहेत. दुसर्‍या वर्गातली माणसे मोकळीढाकळी, हसतखेळत, गप्पा मारत प्रवास करणारी आहेत. सहसा आजकाल दुसर्‍या वर्गातही चौथी सीट कोणी क्लेम करत नाही. शक्य असेल तरच, नाहीतर सोडून देतात. ह्या माणसांमध्ये टाइमपास चांगला होतो, ती खूप जवळची वाटतात. त्यांच्यात माणुसकीचे दर्शन होत राहते. सायन-दादर पर्यंत उठून दुसर्‍याला बसायला जागा देतात. एखाद्याला उभे ठेऊन शेवटपर्यंत बसून राहात नाहीत. पहिल्या वर्गातली माणसे आढ्यताखोर, फारशी तडजोड न करणारी व स्वत:त मग्न असतात. कधीतरी होणारे भांडण सोडले तर इथे फारशी करमणूक होत नाही.

हे सर्व कशासाठी ?

परवा स्टेशनवर संध्याकाळी रिक्षेच्या रांगेत उभा होतो. तेवढ्यात एक वॅन येऊन डाव्या बाजूला काही अंतरावर थांबली. पाच सहा पोलिस बाहेर पडले व एक स्ट्रेचर बाहेर आणून जमिनीवर ठेवण्यात आला. त्यावर सफेद कपड्यात पूर्णपणे आच्छादलेली बाॅडी होती. रांगेतले सर्वजण तिकडे बघू लागले. काही संबंध नसताही मन विषण्ण झाले. आज एका पुस्तकात वाचलं,"सृष्टीत जीवन म्हणजे अपघात आहे व मृत्यू हाच नियम आहे". वाचून चांगलाच उडालो. असेच जर असेल तर जन्मापासून आपण जे जगतो, जमवतो, जपतो ते कशासाठी. कशाला ते हेवेदावे, अहंकार, मत्सर व चढाओढ. कशाला त्या काळज्या, ताणतणाव व भयाचे सावट. आयुष्य म्हणजे एका टूरवर आलो आहोत असं समजावं आणि प्रत्येक क्षण हे दान आहे असं समजून सत्कारणी लावावा. मृत्यूच्या प्रत्यक्ष व शाब्दिक दर्शनाने कोणीतरी डोळ्यात झणझणीत अंजन घातल्यासारखे वाटले.

Not fit enough

Today a blood donation camp had been organised during working hours. The blood was to be collected for children affected with thalassemia disorder. The donor conditions were accordingly very strict. No one taking medicine for hypertension or diabetes or any other ailment was allowed to donate. It was really pathetic that many willing donors above 40 and most above 50 were disqualified as they were on some treatment or other. The camp was successful only because of youngsters and seniors could only watch. This reflects how little importance is given to health in our society, particularly as the age advances. Indulgence is the order of the day and health is put on a back burner. We must change to a lifestyle in which healthy body and mind is given the utmost priority. It was heartening to see today that one British lady who happened to be around the premises at the time came forward to donate, was found fit to donate and donated blood with a smile on her face.

वृंदावनी सारंग

शनिवारची सुट्टी आहे आणि बाहेर मस्त पाऊस पडतोय. कामाच्या दिवशी नकोसा वाटणारा पाऊस सुट्टीच्या दिवशी हवाहवासा वाटतो. वातावरण थंड होते. दुपारी जेवण करून मस्त गुरफटून झोपायचं व चार वाजता उठून कडक चहा प्यायचा. पण आज जेवणानंतर वृंदावनी सारंग ऐकायची तल्लफ आली. दुपारच्या वेळी गायला जाणारा हा काफी थाटातील राग. जसा भीमपलास आवडतो तसेच मला सारंग रागाचेही सर्व प्रकार आवडतात. पण वृंदावनी खास करून. यू ट्यूबवर पं. भीमसेन जोशींचा ४२ मिनिटांचा वृंदावनी सारंग ऐकला आणि मन तृप्त झाले. हे राग कोणी कधी बनवले काहीच कल्पना नाही. गेल्या शतकात अनेक प्रतिभावंत कलाकारांनी नवीन राग बनवले, बनवण्याचा प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर पारंपारिक रागांच्या ताकदीचा एकही नवीन राग कोणी बनवू शकलेलं नाही. हे राग ज्यांनी निर्माण केले त्यांना मनापासून प्रणाम. रवींद्र शेणोलीकर

पाऊस

आता पाऊस जरा जरा लागला आहे. आभाळ भरले आहे. रिपरिप सुरू आहे. झाडे चिंब झालीयेत. पानांतून पाण्याचे थेंब टपकतायत. खाली छोटीछोटी तळी जमू लागली आहेत. मधूनच पावसाचा जोर वाढतो. आवाज वाढतो. हाॅलमधल्या ओट्यावर बसून मी ही सगळी गंमत बघतोय. कमालीचा आळस अंगात भरलाय. घराबाहेर पडावेसे वाटत नाहीये. अंतर्मुख करणारा हा पाऊस पाहात बसून रहावेसे वाटतेय. लहानपणी शाळा व पाऊस एकाच सुमारास जून महिन्यात सुरू व्हायचे. कोणीतरी शिक्षा केल्यासारखे वाटायचे. हुरहूर वाटायची. वर्ग बदलायचा, शिक्षक बदलायचे. मग हळूहळू नवीन वातावरणात रूळायला सुरूवात व्हायची. आजही पावसाळ्यात शाळेत जाणारी मुले पाहून ते दिवस आठवतात. त्या संमिश्र भावना आठवतात. पुन्हा एकदा शिकावेसे वाटते.

World Cup 2018

The world cup 2018 has taken off in Russia in a grand way. The games I have been lucky enough to watch so far were so clean, it was a joy to watch. The Spain vs Portugal game was incredible and the world saw the genius of Christiano Ronaldo. The Peru vs Denmark game was equally riveting with Peru losing despite overall dominance. I missed the Argentina Iceland game and it was a shock to know about Lio's missed penalty. Today Germany has lost to Mexico in a major upset. Now the Brazil vs Switzerland game is about to start shortly. This world cup is going to be awesome, one gets the feeling. Let's sit back and enjoy. While this is the scene on field, one can only imagine what must be going on around the places holding these games. There must be a frenzy around the venues with spectators having a time of their life. So many Indians have travelled to Russia even though India is not among the participating nations. With every kick-off the heart is just flying to Russia.

In the clouds....briefly

We set out on Saturday morning for a weekend at Lonavla. My family and my sister's. Just half an hour journey and we stopped at McDonald's for breakfast. They have egg and cheese muffins that I like. Feeling good we left and two hours later reached Lonavla. We were to stay at a bungalow which belongs to my sister's family friend. It is on amby valley road at a good altitude. A caretaker, a young boy of 25 years, looks after the upkeep and also prepares food. We had carried a lot of vegetables, eggs, bread and what not. The bungalow has a beautiful, expansive sit-out overlooking the valley below. The view is just magical. At any moment clouds start drifting in. You spend most of your time in the sit-out rather than inside the bungalow. For a still better view one can go onto the terrace. Sitting on the bench there and watching the scenery before you, one loses all track of time. The caretaker made sumptuous meal and we had a deep nap. It started raining in the evenin...

At work

Doing your work in the best possible way gives indescribable joy and satisfaction. Sometimes it is tedious, stressful and challenging. But after going through all that and coming out a winner gives you the ultimate feeling. It is work that gives value to rest and recreation. It is the work that you do that defines you, gives you identity. Do it with utmost seriousness and never turn your back to it. Along the way a day dawns when you are rewarded for your efforts, you get recognition and things start to fall in line. You should not aspire for it though. Just enjoy working. No reward is greater than the contentment you feel inside you.

Ambition

When I was quite young some people would ask me what was my ambition. I never had a ready answer. A friend once remarked that a person without ambition is like an animal. I was a bit embarrassed though I did not see myself that way. I was so taken by the myriad beautiful things that life had to offer that I had no time for ambition. The priority was movies, sports, reading, picnics, friends and so on. When I grew up I understood that ambition, so far as I was concerned, was quite boring. For me life did not mean becoming an engineer or a doctor, work my way up in a company and some day occupy a higher position. It did not mean seeking power and have control over people. It did not mean starting a business and earn a lot of money. My ambition, if it could be called so, was to know how things work, to know the principle behind the manifestation, to revel in the abiding beauty of our planet, to enjoy the arts, to ponder the human existence, to decipher the science of things. Having ...

Writing

Writing is funny. Sometimes you write a post with ease and flow. You get the right words and phrases along the way and you are quite pleased and satisfied at the end. The post has come out like you had it in your mind. But sometimes the response to such a post may not be great. You are surprised. You, being satisfied yourself, had expected a better response. However, regardless of the lack of good response, you remain satisfied because your satisfaction has come from within. You do not depend upon anybody else. Sometimes the reverse happens. You have something in mind but find it very difficult to put into words. You finish the post somehow but are not entirely happy with it. You are conscious that it could have been better and you could not get all words or phrases right. You post it anyway. Then, to your surprise you find that the response to the post is pretty good. There are some compliments given. You quickly get over your disappointment. It has been cured by the overwhelming ...

झोपाळा

झोपाळ्यावर बसणे माझीच नाही तर बहूसंख्य लोकांची आवडीची गोष्ट आहे असे म्हणायला हरकत नाही. झोके घेतले की ते घेतच रहावेसे वाटतात व काही केल्या उठावेसे वाटत नाही. झोपाळ्याची अशी आगळी जादू आहे. झोपाळा म्हणजे दोन बाजूंनी टांगलेला, तीन जण बसू शकतील असा, सर्वात चांगला. हल्ली सिंगल साखळीचे, हूक लावून ग्रिलवर टांगलेले एकच व्यक्ती बसू शकेल असेही झोपाळे येतात. त्यात सुद्धा झोके घेत बसून रहावेसे वाटते. त्यांचा फायदा म्हणजे ते ३६० अंशात कसेही वळू शकतात. लहानपणी काॅलनीतल्या एका मित्राच्या घरी बाहेरच्या खोलीत असा छान झोपाळा होता. कधीही गेलो की मी त्यावरच बसत असे. कोकणात माझ्या मामाच्या घरी माजघरात असाच सुंदर झोपाळा आहे. त्यावर बसून मामा मामीशी गप्पा मारणे म्हणजे अमृतानुभव. तीन चार वर्षांपूर्वी माझ्या फॅमिलीने मला सिंगल साखळीचा झोपाळा वाढदिवसाची भेट म्हणून दिला. मला सर्वात आवडलेली गिफ्ट. मला वाटते कुठल्याही घरात तीन गोष्टी जरूर असाव्यात. पहिली एक छान बुकशेल्फ — सुंदर पुस्तकांनी भरलेली. दुसरी म्हणजे एखादे वाद्य — पेटी, गिटार, काही नाही तर निदान तानपुरा. आणि तिसरी म्हणजे झोपाळा.     ...

षड्ज

षड्ज षड्ज म्हणजेच शांत षड्ज म्हणजे समाधान षड्ज म्हणजे समाधी षड्ज म्हणजेच ध्यान षड्ज म्हणजे आत्मरूप षड्ज म्हणजे मूलतत्व षड्ज म्हणजे ओंकार षड्ज म्हणजेच सत्व षड्ज म्हणजे निर्विकार षड्ज म्हणजे निसर्ग षड्ज हाच दीपस्तंभ षड्ज विना कुठला राग जगणे जणू षड्ज व्हावे षड्जात अखंंड रहावे ह्रदयी असावा षड्ज मनात नांदावा षड्ज                रविंद्र शेणोलीकर

प्राणायाम

श्वास घ्या व श्वास सोडा. पूर्ण लक्ष श्वासाकडे द्या. मनात आणि कुठले विचार नकोत. श्वास घ्या व हळूहळू श्वास सोडा. सुरेशराव त्याप्रमाणे करत होते. तेवढ्यात त्यांना आठवले, जाताना भाजी घेऊन जायचे आहे. बायकोने बजावले आहे. अरे, हे काय मनात आले! श्वास घ्या, श्वास सोडा. दुसरे विचार नकोत. पण आज संध्याकाळची सोसायटीतली सभा मात्र चांगलीच गाजणार. पार्किंगचा प्रश्न अगदी ज्वलंत झालाय. पण ते जाऊदे. श्वास घ्या, श्वास सोडा. चिरंजीवांची परिक्षा आठवड्यावर येऊन ठेपली. पण अभ्यासाचे नाव नाही. ऐनवेळी रात्री जागवणार. अरे, पुन्हा भरकटलो. काॅन्सनट्रेट. श्वास घ्या, श्वास सोडा. त्या कुलकर्ण्याला मेमो दिला पाहिजे. काही काम करत नाही. दिवसभर इकडे तिकडे टाइमपास करत फिरतो. चचच. काय हे. कशाला आलोय इथे? लक्ष दे नीट. श्वास घ्या, श्वास सोडा. मनात कुठलेही विचार नकोत.

कोसला

'कोसला' ही भालचंद्र नेमाडेंची सुप्रसिद्ध कादंबरी नुकतीच वाचून पूर्ण केली. मला वाटत होतं कादंबरी खूप गंभीर वगैरे असेल. पण वाचायला सुरूवात केली आणि लेखनाच्या प्रवाही शैलीत कधी वाहात सुटलो कळलंच नाही. पंचवीस वर्षाच्या महाविद्यालयीन युवकाचे हाॅस्टेल व काॅलेज जीवनाचे चित्रण कादंबरीत रंगवले आहे. तो एका खेड्यातून शहरात शिकायला आला आहे. तीन चार वर्षांच्या काॅलेज जीवनातील त्याचा संघर्ष, त्याचे उपद्व्याप, त्याने जमवलेले मित्र, परिक्षा, अभ्यास, जागरण अशा अनेक गोष्टी कथेच्या अनुषंगाने येतात. विचारांची तारूण्यसुलभ बंडखोरी, जुन्याचा तिरस्कार, नव्याचे आकर्षण वगैरे वाचताना आपला काळ आठवल्याशिवाय राहात नाही. मात्र ही कादंबरी एवढी का गाजली ते मला कळेना. १९६३ सालची कादंबरी आहे. मला वाटतं त्या काळाचा विचार करता ती खूपच निर्भीड, प्रांजळ व बंडखोर असल्यामुळे तेव्हाच्या तरूणाईत ती लोकप्रिय झाली असावी. ह्या कादंबरीला अनेक पुरस्कार मिळाले व ती अनेक भाषांत रूपांतरीत झाली. शेवटी मी माझ्या एका सुविद्य व साहित्यात चांगला रस व रूची असलेल्या मित्राला त्याचे मत विचारले. तो म्हणाला की एखाद्या विशिष्ट वयाच्...

बीकेसी

गेले दोन दिवस बांद्रा-कुर्ला काॅम्प्लेक्समधे ट्रेनींगसाठी जातोय. कुर्ल्यापर्यंत लोकल व पुढे शेअर रिक्शा घेऊन जावे लागते. रिक्शासाठी मोठी रांग असते. पण पोलिसांच्या उपस्थितीमुळे सर्व शिस्तित चालले होते. दहा मिनिटात रिक्शा मिळाली. स्टेशनबाहेरील छोट्याछोट्या गल्ल्यांतून वाट काढत पंधरा वीस मिनिटात तीस रूपये देऊन मी इप्सित स्थळी पोहोचलो. दुपारी एका सहकार्‍याच्या ॲक्टिव्हावर बसून आजूबाजूच्या भागात फिरलो. त्याचे बँकेत काही काम होते. बीकेसीतल्या मोठमोठ्या ऑफिस इमारती पाहून डोळे दिपले. ह्या भागात रोज लाखो लोक कामासाठी येतात. त्यांचे अतोनात हाल होतात. पश्चिमेला बांद्र्याहून तर पूर्वेला कुर्ल्यावरून शेअर रिक्शा किंवा बसने प्रवास करावा लागतो. इथे मेट्रोचे जाळे असणे फार जरूरीचे आहे. इतक्या वर्षात ह्या भागात एवढ्या ऑफिस बिल्डिंग्ज होऊनही सामान्य लोकांसाठी काही सुविधा निर्माण करावेसे कोणाला वाटले नाही ही अतिशय दुर्दैवी गोष्ट आहे. संध्याकाळी पुन्हा शेअर रिक्शा. गुरूवारी कुर्ला स्टेशनबाहेर बाजार भरतो. तुफान गर्दी रस्त्यावर. शेवटी रिक्शा स्टेशनपासून काही अंतरावरच सोडली व त्या जनसागरातून वाट काढत का...

Heaviness

The danger of falling into a routine is that you get so dead from within. You see but do not observe, you hear but do not listen. The mind stops registering. Then nothing new emerges from the mind. It is the death of creativity. You feel a heaviness which does not move. You cannot shake it off. It settles down on your being. You just go through the motions, day in day out. To keep this heaviness at bay, you must constantly break your routine. Start doing new things all the time. Give your eyes and ears to novelty. Make your daily routine itself accommodate change and introduce change in it. If you do it, who knows, you may start living again. Ravindra Shenolikar

Mangoes

Image
Today I completed a task at work which had been pending for some time and was at the back of my mind long enough. Needless to say, it gave me immense relief. I was in celebratory mood. I thought I would take a bottle of wine home and enjoy the moment. Then I remembered that mangoes had arrived in the market. We had not yet tasted the first mangoes of the season. Rather than enjoying wine all by myself, I thought the better idea was to buy mangoes which would be enjoyed by the whole family. So I bought some mangoes on my way home. Wine can wait.

स्वर

स्वर होता जरी तो सवेच माझ्या गवसला न मज कधी आजवर जरी जाणवे त्याचे असणे उपेक्षिला मी त्यास निरंतर तरीही न रूसला माझ्यावर तो वाट पाही जणू विठू विटेवर अवचित एकदा येता कंठी ह्रदयी माझ्या आला गहिवर आनंदाच्या विशाल गगनी होऊ लागला माझा वावर जेव्हा अखेर मी आळवला गोठवलेला माझा हा स्वर

Raid

Ajay Devgan always delivers a powerful performance. The role was most suitable for him - that of an upright income tax officer. Most of the movie unfolds in a hugh haveli, but it is full of twists and turns. You are glued as the story unfolds and not a moment is boring. Ileana looks drop dead gorgeous though she has very little to do in the film. Saurabh Shukla is very good once again as Tauji. Do watch, it's full on entertainment.

मारवा

मारव्याच्या स्वरांनी मन पार भूतकाळात गेलं..... ते मंतरलेले दिवस....आईवडिलांच्या प्रेमाची अखंड झालर......तारूण्याचा जोश.......मित्रांचा सहवास.....स्वत:चे हळूहळू उमगू लागलेले मीपण......नव्या आवडी, नवे छंद......खेळाचे आकर्षण.....बंडखोर विचार.......महत्वाकांक्षा.......स्वप्नरंजन.......गुदगुल्या करणारे यौवन....... थांबवा कोणीतरी हे काळजाला भिडणारे मारव्याचे स्वर....बस्स.....इनफ.

Love in crowded train

Evening time. Office goers returning home. Local train is crowded. I could get a window seat somehow. Opposite me in the window was a young, smart looking girl and next to her sat her boyfriend. They were quite lost in their world, chatting continuously in low tone, laughing, showing each other photos from their mobile phones. People, pretending not to notice, could not help watching them. They were obviously attracted to each other. The boy was bent forward most of the time and the girl had her left hand round his shoulders off and on. The boy had nice hair and the girl liked stroking his hair while talking. Despite their public display of affection they maintained a dignity that I liked. Time did not matter to them. Perhaps they wished for the train to run late. Love is a pretty sight. The daily drab routine of the people around was brightened up today by the youngsters.

On the steps of Sabarimala

I used to visit Sabarimala in Kerala with my friends those days. We used to stay at my friend's place and leave in the evening in a hired mini bus to reach the footsteps of Sabarimala late in the night. Then the steep climb would begin and we would reach the gate at around five in the morning. The gates opened at six and there was always a rush to climb the steps and be one of the first to take a darshan of Lord Ayappa. Once, on one of these visits, as the gates opened we all started to rush in. Suddenly one elderly lady took support of my left shoulder to climb the steep steps. I let her and again started going forward. But she held my shoulder and requested me in a language I did not understand to help her climb the steps. Notwithstanding her language, I understood what she had to say. I gave up the idea of rushing through the gates and allowed her to clutch my shoulder and climb the steps one by one. Already my friends and others had gone far ahead. We entered the gate and the...

Without a care

Image
I was just coming out of a restaurant at Cuffe Parade. Outside a paan shop, near the railing, a girl was standing alone, smoking in quite a style, without a care in the world. I instantly liked her. She seemed to be making a statement. That I am free, independent. I can decide for myself, choose for myself. That I shall have what I want and refuse what I don't like. I wished I could take a photo of her. But, alas, that was not possible. Her image remained with me in my mind. There is something about a smoking girl, I thought.

A little girl sells books

I was travelling back in the evening by a local train as usual. There was a moderate crowd. A little girl suddenly came alongside where I was sitting. She was carrying some colouring books, trying to sell them. I noticed that she wore very clean clothes and she herself was very clean. I felt sad that at this age, when she should be going to school and playing with friends, she has to sell books in a train. No one was buying any book. I estimated the price of a book to be Rs.20/-. I asked her and she told me it was Rs.100/-. I was quite shocked. I really had no use for the books as my children are well past that age. When I refused to buy she said she would give it for rs.80/-. Then she showed me the printed price on the book which was just Rs.30/-. I was touched by her innocence. But I declined to buy the book for Rs.80/-. She went away then, seeking other buyers. The train halted and I got down, wondering if I should have bought the book for Rs.80/- to help the girl.

Sunday morning options

It's a beautiful Sunday morning. Calm and peaceful. Just finished reading newspapers. What next? I could go to a music programme at Sahayog mandir featuring local artists. But that looks unlikely. I could read for a while. The probability of this happening is quite high. I could play harmonium. Some song should enter my mind and inspire me. I intend to have a nice breakfast which is a certainty. There is some office work I have brought home. It has to wait till after 11. Having jotted down these options, the confusion in my mind has cleared somewhat. Now I can get down to giving effect to these options. Writing can be so helpful. It can give you clarity and free your cluttered mind.

Liberty

Image
After lunch we went out for a stroll. It was hot and we kept to the shaded side of the road. Soon we reached a huge gate and a high walled wide structure. On the gate was written "Arthur Road Jail". My colleague told me that it was always overcrowded. I wondered what kind of world lay behind those walls. Would anyone want to take a selfie here? As we were looking around, a police van pulled up alongside. Some 10-12 uniformed policemen got down first, followed by several accused. I looked at them. They looked pretty ordinary people. You would not have recognised them in a crowd. Some were quite young, others older. I wondered what their offence was, what crime they had committed and why. They crossed the road, each closely watched over by a policeman, and entered the gate. They had lost their liberty for who knows what period. What effect this will have on their families who were possibly at no fault. We started back pensively to our workplace. We too were tied up in our...

I wish

How dearly I wish That I have nothing to do But only read & write Nothing but read & write How dearly I wish that I have nothing to do But travel here & there see this place & that site How dearly I wish That I have nothing to do But watch films & plays Listen to music with delight How dearly I wish That I have nothing to do But gather old friends Party hard late into night

A search in secret India - by Paul Brunton

I have been reading this wonderful book for the past few weeks. It is an account of a westerner who visits India in search of truth and spirituality, to know the facts about the yogic traditions and mystical experiences and has a scientific and skeptical attitude. He traverses the length and breadth of the country, from the south to the north, to gain some wisdom and enlightenment which will stand scientific scrutiny. He meets astrologers, fakirs, spiritual masters, interviews them and tries to understand the elusive spiritual truth which he is seeking. It is an excellent account of the India we know in the eyes of a westerner. The author is himself driven by this urge to know and understand the age old questions that human beings invariably ask themselves during their journey of life. I would recommend this book to those beset with such questions and looking for answers. They may get some insights from this book.

नाट्यत्रयी

गेल्या रविवारी महेश एलकुंचवार लिखित नाट्यत्रयी, वाडा चिरेबंदी, मग्न तळ्याकाठी व युगान्त, गडकरी रंगायतनला बघितली. फारसा ताण जाणवला नाही. कारण पहिली दोन नाटके खिळून ठेवणारी होती. युगान्त मात्र फारसं आवडलं नाही. पहिल्या दोन नाटकांच्या पंक्तीत बसत नाही असं वाटलं. पहिल्या दोन नाटकांचे स्टार म्हणजे प्रसाद ओक, वैभव मांगले व निवेदिता सराफ. दुसर्‍या व तिसर्‍या नाटकात काम करणारे चिन्मय मांडलेकर व सिद्धार्थ चांदेकरही चांगली छाप पाडतात. ह्या सर्वातही मला निवेदिताचे काम अतिशय भावले. याआधी तिला फक्त चित्रपटात पाहिले होते. पण रंगभूमीवर ती इतका उत्कृष्ट अभिनय करते हे माहित नव्हते. तसंच एका प्रसंगात प्रसाद ओकने सर्व प्रेक्षकांसमोर बसून आरामात दाढी केली आहे. ती करताकरता त्याचे संभाषण चालू आहेच. मी कोपरापासून हात जोडले. ह्याला म्हणतात आत्मविश्वास. वैभव मांगलेनी मोठा भाऊ उत्तम साकार केला आहे. शिवाय पौर्णिमा मनोहरने अंजली छान साकार केली आहे. मग्न तळ्याकाठी मला सगळ्यात जास्त आवडले. एलकुंचवारांचे भाषावैभव जागोजागी डोकावत असते. चंद्रकांत कुलकर्णींचे दिग्दर्शन लाभलेली ही नाट्यत्रयी आवर्जून पाहावी अशीच आहे.

The weekend rush

Nowadays, whenever there is a long weekend, there is a mad rush to leave the city. A traffic jam ensues in the morning on the Mumbai Pune express way. People either go to their second homes or to nearby resorts or rented bungalows at Lonavla or farmhouses nearby. When they reach their destination is anybody's guess. Then two days and nights of splurging money on food and drinks and what not and then back to the city on Sunday, ready and hopefully refreshed for another week of daily struggle. Whereas I too crave to leave the town once in a while on such occasions, I equally cherish staying at home, doing things I like without the bother of time, reading and writing, playing harmonium, doing little things around the house. The absence of pressure of time is like you were choking all the time and suddenly received fresh air. Spending time aimlessly without plan gives me a great sense of freedom. I love being at home with nothing much to do.

Goodbye Sridevi

She burst onto the bollywood scene with Himmatwala in 1983. Perceived initially as the new hot girl, she soon drew crowds to third rate films like Tohfa and Justice Chodhary, just on the strength of her graceful dancing. Very quickly she passed this phase and entered the top league with films like Mr. India. Her sensuous dance in dark blue saree in the song "kate nahi katte ye din ye raat" was a riot and she became a queen of the celluloid. She ruled for the next 4-5 years with films like Chaalbaaz, Chandani and Lamhe among others. Her acting skills had been acknowledged long back in the film Sadma and it was evident that she excelled in every sphere of performance. By this time winds of change had started to blow and a new star was born by the name of Madhuri. Sridevi married Boney Kapoor in 1996 and took a long break from films. She came back in 2012 with an impact performance in English Vinglish. In 2017 she appeared in her last film Mom. She acted in many regional films ...

Dilemma

I recently visited a spacious air conditioned bookstore in Fort area. The books were nicely stacked for display. I enjoyed leafing through fresh arrivals of different genres. At last I selected and bought a book with that smell of freshness that all readers love. However, next day I was dismayed to see the same book being offered online for 30% less. I felt a bit cheated and vowed to make all future purchases online. Then yesterday came the news of strand book stall closing its shutters in a week's time. One reader had remarked that the joy of visiting a book store can never be compared to online purchase. I completely agreed. Perhaps the extra cost we have to pay is for experiencing that joy. Still money is money. Two books bought online might save enough to buy a third. But I know that I can never give up the joy of visiting a bookstore. I suppose I will have to adopt a mixed policy in future so that I achieve a reasonable balance.

उपरती

शेवटची चढण चढून ती कड्याच्या टोकाशी येऊन उभी राहिली. खालच्या खोल दरीत तिने डोकावून पाहिले. बस्स, आता एक उडी आणि संपेल एकदाचे सर्व काही. दारूण निराशा, दु:ख, वेदना....सगळ्याला पूर्णविराम. कायमचा. तिने मान वर करून पाहिले. अनंत निळे आकाश सर्वदूर पसरले होते. केवढी अफाट आहे ही सृष्टी! थांगच लागत नाही. अंतराळात अशा किती सृष्टी आहेत त्याची गणतीच नाही. क्षितिजापर्यंत तिची नजर जाऊन भिडली. त्या भव्यतेपुढे तिला तिचे दु:ख फार क्षुद्र वाटू लागले. अशी होते का मी? पराभव स्वीकारणारी, पळपुटी?   कधीच नाही. संघर्षाला मी कधीच घाबरले नाही. मग आज इथे का आले आहे? मंद वार्‍याची झुळुक अधूनमधून येऊन सुखावत होती. तिला वाटले, आपण एखाद्या गोष्टीत इतके बुडून जातो, की त्याच्या पलिकडे काही जग आहे हेच विसरायला होते. मनाचे हे घेरलेपण मोडले तर सगळं सोपं होऊन जाईल. तिची चूक तिला आता उमगली होती. त्या विस्तीर्ण भवतालाने तिला काहीतरी शिकवले होते. तिच्या चेहर्‍यावरचे मळभ दूर होऊन प्रसन्न स्मित झळकू लागले. आत्मविश्वासाने ती मागे वळून चालू लागली....पुन्हा एकदा.....जीवनाकडे. ...